शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जखमी नागाला शिराळकरांनी दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:59 IST

विकास शहा ।लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : शिराळकर आणि नाग हे नाते वेगळेच आहे. याची प्रचिती अनेकवेळा आली आहे. नागाबाबत फक्त नागपंचमीपुरते प्रेम नसून ते कायम आहे, हे अनेक घटनांवरुन स्पष्ट झाले आहे. मुंगसाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागाचे प्राण येथील युवकांनी वाचवले आणि आत्मियता दाखवून दिली.सागाव (ता. शिराळा) येथे रस्त्याकडेला मुंगसाच्या ...

विकास शहा ।लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : शिराळकर आणि नाग हे नाते वेगळेच आहे. याची प्रचिती अनेकवेळा आली आहे. नागाबाबत फक्त नागपंचमीपुरते प्रेम नसून ते कायम आहे, हे अनेक घटनांवरुन स्पष्ट झाले आहे. मुंगसाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागाचे प्राण येथील युवकांनी वाचवले आणि आत्मियता दाखवून दिली.सागाव (ता. शिराळा) येथे रस्त्याकडेला मुंगसाच्या हल्ल्यात जखमी झालेला नाग निपचित पडला होता. हा नाग मेला असावा, असे नागरिकांना वाटले. मात्र या मार्गावरून जाणाऱ्या शिराळा येथील बंटी नांगरे, विक्रांत पवार, शिवकुमार आवटे, मनोज खबाले यांनी गाडीवरून उतरून पाहिले असता, त्याची थोडी हालचाल दिसली.या चौघांनी लगेचच जखमी नागास शिराळा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आणले. त्याच्या डोळ्यावर तसेच शरीरावर दहा ते बारा ठिकाणी गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल गावडे, सुशांत शेणेकर, मोहन चव्हाण यांनी उपचार केले. यावेळी चौघांनीही नागास व्यवस्थित पकडल्याने त्याच्यावर व्यवस्थित उपचार करता आले.शिराळा येथील नागरिकांनी याअगोदरही अनेकवेळा शेतात नांगरताना, कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या, तसेच कूपनलिकेमध्ये अडकलेल्या नागाचे प्राण वाचवले आहेत.शिराळा येथे साप दिसला की त्यास पकडून सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडले जाते. साप जखमी अवस्थेत असेल, तर त्याच्यावर उपचार करून पूर्ण बरा झाल्यावरच त्याला सुरक्षित ठिकाणी सोडले जाते.सुरक्षित जागी सोडणारवनक्षेत्रपाल तानाजीराव मुळीक, सचिन पाटील यांना कल्पना दिल्यावर ते तातडीने दवाखान्यात आले. उपचार झाल्यावर या जखमी नागास त्यांनी ताब्यात घेतले. आणखी काही दिवस उपचार करावे लागणार आहेत. त्यामुळे त्यास सुरक्षित पेटीत ठेवले असून, त्याची योग्य काळजी घेतली जात आहे. तो पूर्ण बरा झाल्यावर त्यास सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येणार आहे.