शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

गर्भपातप्रकरणी चौगुले हॉस्पिटलचा परवाना रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:05 IST

सांगली : येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. मुख्य संशयित डॉ. रूपाली चौगुले व डॉ. विजयकुमार चौगुले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना सादर केला असून, त्यांच्या रूग्णालयाचा परवाना रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी सोमवारी पत्रकार ...

सांगली : येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. मुख्य संशयित डॉ. रूपाली चौगुले व डॉ. विजयकुमार चौगुले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना सादर केला असून, त्यांच्या रूग्णालयाचा परवाना रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली. चौगुले दाम्पत्याची वैद्यकीय सनद रद्द करण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार केला असून, तो लवकरच मेडिकल कौन्सिलला सादर केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.डॉ. चौगुले दाम्पत्याच्या बेकायदा गर्भपाताचे प्रकरण उजेडात आल्यानंतर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रमुख अधिकाºयांची बैठक घेत कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हाधिकाºयांनी कारवाईची माहिती दिली. ते म्हणाले की, गणेशनगर येथील पाचव्या गल्लीतील चौगुले हॉस्पिटलमध्ये महापालिकेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात गर्भपातासह भ्रूणहत्येचा प्रकार समोर आला आहे. डॉ. रूपाली चौगुले व तिचा पती डॉ. विजयकुमार चौगुले हे दोघेही शासकीय सेवेत असताना त्यांच्याकडून भ्रूणहत्येसारखा प्रकार घडल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसारच सोमवारी दुपारीच आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना दोघांच्याही निलंबनाचा प्रस्ताव पाठविला आहे. यावर तातडीने कार्यवाही होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महापालिकेनेही या रुग्णालयाला दिलेला नोंदणी परवाना रद्द केला आहे. भ्रूणहत्येसारखे गंभीर प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी या दोघांचीही वैद्यकीय सनद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव मेडिकल कौन्सिलला पाठविण्यात येणार आहे.चौगुले दाम्पत्यावर कारवाई करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन आणि विधी विभागातर्फे संयुक्तपणे कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबूडकर, अप्पर जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. उल्हास चिप्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर आदी उपस्थित होते.नातेवाइकांकडून भ्रूणांची विल्हेवाटभ्रूणांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नातेवाइकांकडेच दिली जात होती, अशी माहिती पोलीस चौकशीत पुढे आली आहे. नागाव कवठे (ता. तासगाव) येथील महिलेचा गर्भपात केल्यानंतर मृत भ्रूण तिच्या नातेवाइकांनी शेतात पुरल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतात खोदकाम करुन शोध सुरु ठेवला आहे.