शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रंथालये वाचकांअभावी ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 16:46 IST

महाविद्यालयीन तरुणवर्ग मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियात अडकल्यामुळे ग्रंथालये ओस पडू लागली आहेत. त्यातच शासनाच्या तोकड्या अनुदानामुळे ग्रंथालयाच्या खर्चाचा मेळ घालताना दमछाक होत आहे. कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यात तर त्याची दाहकता जास्त जाणवत आहे.

ठळक मुद्देकवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रंथालये वाचकांअभावी ओसलोकवर्गणीतून कसा निधी गोळा करायचा, हा प्रश्नच

जालिंदर शिंदे घाटनांद्रे : महाविद्यालयीन तरुणवर्ग मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियात अडकल्यामुळे ग्रंथालये ओस पडू लागली आहेत. त्यातच शासनाच्या तोकड्या अनुदानामुळे ग्रंथालयाच्या खर्चाचा मेळ घालताना दमछाक होत आहे. कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यात तर त्याची दाहकता जास्त जाणवत आहे.शालेय विद्यार्थी, तरुण पिढी ग्रंथालयात फार कमी दिसू लागली आहे. दिसलेच तर चार-दोन वृत्तपत्रे चाळणारेच जास्त आढळतात. स्मार्ट फोनच्या युगात वाचकाविना कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रंथालये ओस पडू लागली आहेत.पूर्वी शाळांना सुटी लागली की ग्रंथालये हाऊसफुल्ल होत असत. हे चित्र मागे पडून सध्याची पिढी मोबाईलमध्येच गुंतलेली दिसते. त्यांनी वाचनालयांकडे पाठ फिरवली आहे. वाचन संस्कृतीला बळकटी मिळावी व त्यासाठी समृद्ध ग्रंथालयाची निर्मिती व्हावी, यासाठी शासनाकडून निधी दिला जातो. पण तो तोकडा ठरत आहे. दहा टक्के लोकवर्गणीतून निधी गोळा करण्याची परवानगी आहे, पण वाचकांनी ग्रंथालयाकडे पाठ फिरविल्यामुळे लोकवर्गणीतून कसा निधी गोळा करायचा, हा प्रश्नच आहे.दुष्काळी ग्रामीण भागात तर हे अशक्यप्राय आहे. सध्या शासकीय नियमानुसार अ वर्ग तालुका ग्रंथालयासाठी ३ लाख ८४ हजार रुपये, ह्यबह्ण वर्गासाठी २ लाख ८८ हजार रुपये, क वर्गासाठी ९६ हजार, तर ड वर्गासाठी केवळ ३० हजाराचे शासकीय अनुदान वर्षाकाठी भेटते.

पुस्तके, मासिके, साप्ताहिके, पाक्षिके, वृत्तपत्रे, त्याचबरोबर कपाट, फर्निचर तसेच पगार, इमारत भाडे आदी खर्च या तोकड्या अनुदानातूनच भागवावा लागतो. खर्चाचा मेळ घालताना दमछाक होत आहे. ते चालवणे जिकिरीचे झाले आहे. 

टॅग्स :libraryवाचनालयliteratureसाहित्यSangliसांगली