शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

विधानसभा आचारसंहिता कधीही लागू द्या, सांगली जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज

By अशोक डोंबाळे | Updated: September 14, 2024 19:05 IST

जिल्ह्यात २४८२ मतदान केंद्रे : आठ विधानसभा मतदारसंघांत ६३३० मतदान यंत्रे पोहोच

अशोक डोंबाळेसांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी सहा हजार ३३० मतदान यंत्रे लागणार आहेत. ती सर्व मतदारसंघाच्या ठिकाणी पोहोच केली आहेत. शासकीय गोदामामध्ये सुरक्षित यंत्रे ठेवली आहेत. तसेच जिल्ह्यातील २४ लाख ५४ हजार ३७७ मतदारांसाठी दोन हजार ४८२ मतदान केंद्रेही केली आहेत. विधानसभा आचारसंहिता कधीही लागू झाली तरी प्रशासनाने मतदार यादी अंतिम करण्यासह निवडणुकीसाठीची सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.राज्य सरकारचा कार्यकाल ३० नोव्हेंबर २०२४ रोजी संपणार आहे. त्यापूर्वी नवीन आमदार निवडून जाणे गरजेचे आहे. म्हणून राज्यात १५ ऑक्टोबरपूर्वी केव्हाही विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. म्हणून जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील जत, इस्लामपूर, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ, सांगली, मिरज, पलूस-कडेगाव, शिराळा या विधानसभा मतदारसंघांसाठी लागणारी मतदान यंत्रे मतदारसंघात तपासून पाठविली आहेत. आचारसंहिता जाहीर होताच अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रशिक्षण सुरू होणार आहे.

अशी आहेत मतदान केंद्रेविधानसभा मतदारसंघ - मतदान केंद्रांची संख्यामिरज  - ३०७सांगली - ३१५इस्लामपूर  - २९०शिराळा - ३३४पलूस-कडेगाव  - २८५खानापूर - ३५६तासगाव-क.महांकाळ - ३०८जत   - २८७एकूण -  २४८२

निवडणुकीसाठी आम्ही तयारविधानसभा निवडणुकीची मतदार यादी अंतिम केली असून त्यानुसार मतदानाची केंद्रेही निश्चित केली आहेत. मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण करून आठही विधानसभा मतदारसंघांत पाठविली आहेत. मतदानाच्या दृष्टीने आमची तयारी पूर्ण झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

२०१९ च्या निवडणुकीचे वेळापत्रक

  • आचारसंहिता लागू : २७ सप्टेंबर २०१९
  • उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख : ४ ऑक्टोबर २०१९
  • नामनिर्देशनपत्रांची छाननी : ५ ऑक्टोबर २०१९
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : ७ ऑक्टोबर २०१९
  • मतदानाची तारीख : २१ ऑक्टोबर २०१९
  • मतमोजणी : २४ ऑक्टोबर २०१९
टॅग्स :Sangliसांगलीvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024