शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

केदारवाडीत महामार्गावर अपघातात बिबट्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 19:53 IST

पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील केदारवाडी (ता. वाळवा) हद्दीतील देसाई मळ्याजवळ सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक वर्षाचा बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला. या वर्षाच्या मादी जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर शेतकरी व वाहनधारकांनी गर्दी केली होती. वन विभागाच्या वनरक्षक अधिकारी दीपाली सागावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ठळक मुद्देकेदारवाडीत महामार्गावर अपघातात बिबट्या ठारवन विभागाकडून पाहणी : शेतकरी, वाहनधारकांची मोठी गर्दी

नेर्ले : पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील केदारवाडी (ता. वाळवा) हद्दीतील देसाई मळ्याजवळ सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक वर्षाचा बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला. या वर्षाच्या मादी जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर शेतकरी व वाहनधारकांनी गर्दी केली होती. वन विभागाच्या वनरक्षक अधिकारी दीपाली सागावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, हा बिबट्या काळमवाडीच्या दिशेने शेतातून कासेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर आला. रात्री बिबट्या महामार्गावर गेल्यानंतर कोल्हापूरहून येणाऱ्या अज्ञात वाहनाची धडक त्याला बसली. या अपघातात त्याच्या पोटाला, तोंडाला मार लागून कानातून रक्त आले होते. यातच त्याचा मृत्यू झाला.

सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. यात बिबट्या धडपडत रस्त्यावरच्या झाडीत येऊन पडला. या मृत बिबट्यास शिराळा येथे विच्छेदन तपासणीसाठी नेण्यात आले. प्राणीमित्र संतोष औंधकर, केदारवाडीचे सरपंच अमर थोरात यांनी वन विभागास याबाबत माहिती दिली. वनक्षेत्रपाल सुशांत काळे, वनरक्षक दीपाली सागावकर यांच्यासह कासेगाव पोलीस ठाण्याचे संतोष देसाई, अभिजित कारंजकर, शिवाजी यादव उपस्थित होते.वनक्षेत्रपालाकडून पत्रकाराचा अपमानघटनास्थळी वनक्षेत्रपाल उशिरा आल्याने बिबट्याचा मृतदेह ताटकळत पडला होता. रात्री १० च्या सुमारास बिबट्या ठार झाला. घटनेनंतर वनक्षेत्रपाल सुशांत काळे पोहोचले. यावेळी ते बिबट्यास हाताळत असताना, पत्रकार फोटो घेऊन माहिती घेत होते. त्यांना, फोटो काढू नका असे म्हणत वनक्षेत्रपालांनी अपमानीत भाषा वापरली. यावेळी त्यांना याबाबत जाब विचारला असता, उत्तर न देता ते निमूटपणे निघून गेले. 

टॅग्स :leopardबिबट्याSangliसांगली