शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
3
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
4
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
5
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
6
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
7
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
8
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
9
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
10
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
11
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
12
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
13
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
14
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
15
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
16
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
17
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
18
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
19
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
20
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: देवराष्ट्रे येथे युवकावर बिबट्याचा हल्ला; रॉट व्हिलर, बेल्जियम शेफर्डने बिबट्याला पळविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 18:01 IST

बछडे झाडावर जाऊन बसले

देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील भरत साळुंखे हे शनिवारी दुपारी ऊस तोडत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. भरत यांनी चपळाईने हा हल्ला चुकवला, याचवेळी भरत यांच्या बरोबर असलेल्या दोन पाळीव कुत्र्यांनी बिबट्यावर प्रतिहल्ला केल्यामुळे बिबट्याने व एका पिल्लाने तेथून पलायन केले.देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील रामापूर रस्त्यावरील बोरीचा ओढा या परिसरात भरत साळुंखे यांचे शेत व घर आहे. घरासमोरील शेतामध्ये भरत साळुंखे ऊस तोडत होते. ऊस तोडत असताना शेताच्या जवळील ओढ्याच्या काठावरील झाडीतून हालचाली आवाज येऊ लागला म्हणून ते झाडीजवळ गेले असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला; परंतु भरत यांनी प्रसंगावधानता राखत हा हल्ला चुकवला. बछडे झाडावर जाऊन बसलेयावेळी भरत यांच्या बरोबर त्यांनी पाळलेले रॉट व्हिलर व बेल्जियम शेफर्ड जातीची दोन कुत्री होती. या दोन्ही कुत्र्यांनी बिबट्यावर प्रतिहल्ला केला. यामुळे बिबट्याने व त्याच्या एका पिल्लाने घटनेच्या ठिकाणावरून उसाच्या शेतातून पलायन केले; परंतु बिबट्याची आणखी दोन पिल्ले ओढ्याच्या काठावरील झाडीमध्ये होती. दोन्ही कुत्री पिल्लांच्या दिशेने गेली असता भीतीने ही पिल्ले झाडावर जाऊन बसली. झाडाखाली दोन कुत्री व माणसे जमा झाल्याने अडीच-तीन तास बिबट्याची पिल्ले झाडावर होती. ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्यावर लक्ष भरत साळुंखे यांनी या घटनेची माहिती वनविभागाला कळवली, यानंतर सागरेश्वर अभयारण्याचे वनक्षेत्रपाल बालाजी चव्हाण व कर्मचारी, वनपाल एस. एस. कुंभार, एस. टी. गवते, वनरक्षक रोहन मेक्षे, एम. एम. मुसळे व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मादी बिबट्या पिल्लांसाठी माणसांवर हल्ला करू शकते, या कारणास्तव घटनास्थळावरील लोकांना मागे सरकवत झाडावर अडकलेल्या बिबट्याच्या पिल्लांना जाऊन दिले. याठिकाणी वनविभागाकडून सदर घटनेच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्यावर लक्ष ठेवले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard attacks youth in Sangli; dogs save him.

Web Summary : In Devrashtre, Sangli, a leopard attacked Bharat Salunkhe. His two dogs, Rottweiler and Belgian Shepherd, counter-attacked, forcing the leopard and its cub to flee. Forest officials are monitoring the area with trap cameras after two more cubs were found.