शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊंचे कासेगावात विधानसभेचे रणशिंग जयंत पाटील ‘टार्गेट’ : इस्लामपूर, शिराळ्यात भाजपचा आमदार निवडून आणण्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:23 IST

कासेगाव : कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी आमदार जयंत पाटील यांचे ‘होम पिच’ असलेल्या कासेगाव येथेच त्यांना ‘टार्गेट’ करून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

प्रताप बडेकर ।कासेगाव : कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी आमदार जयंत पाटील यांचे ‘होम पिच’ असलेल्या कासेगाव येथेच त्यांना ‘टार्गेट’ करून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. यावेळी झालेल्या भाषणामध्ये त्यांनी आवर्जून इस्लामपूर आणि शिराळ्यामध्ये भाजपचाच आमदार असेल, असे जाहीर करून आ. पाटील यांना आव्हान दिले आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी वर्षाहून अधिक कालावधी असला तरी, वाळवा आणि शिराळा तालुक्यात आतापासूनच याचे वारे वाहू लागले आहेत. अनेक इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. इस्लामपूर मतदार संघात तर आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात जोरदार व्यूहरचना सुरू आहे. यामध्ये दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सहभागी आहेत. काहीही झाले तरी यावेळी आमदार जयंत पाटील यांचा पराभव करायचा, असाच कानमंत्र त्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना दिला आहे. त्यामुळेच त्यांनी तालुक्यात विकासकामांचा धुमधडाका सुरू केला आहे. भाजपनेही निधी कमी पडू न देता ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू केली आहेत.

चार दिवसांपूर्वी कासेगाव येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन व भूमिपूजनानंतर झालेल्या जाहीर सभेत मंत्री सदाभाऊ खोत यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर खरमरीत टीका करत आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुलच वाजवला आहे. वाळवा-शिराळा तालुक्यात आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. वाळवा तालुक्यातील ४८ गावे शिराळा मतदार संघात समाविष्ट आहेत. त्यामुळे या गावांची भूमिका नेहमीच महत्त्वाची ठरत आलेली आहे.

शिराळा विधानसभा मतदार संघातून विद्यमान आ. शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आमदार शिवाजीराव नाईक आणि सदाभाऊ खोत यांनी शिराळा मतदार संघातील मोठ्या मोठ्या गावात विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला असून, आगामी निवडणूक आपलीच असेल, असा दावा केला आहे. त्यातच माजी जि. प. सदस्य, महाडिक युवा शक्तीचे संस्थापक सम्राट महाडिक यांनीही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.

यासाठीच त्यांनी शिराळा येथे भव्य प्रमाणात नोकरी मेळावा घेतला होता. याच कार्यक्रमात आमदार नीतेश राणे यांनी स्वाभिमान पक्षाची उमेदवारी सम्राट महाडिक यांना जाहीर करून टाकली. यावेळी काहीही झाले तरी मैदानात उतरणार, असा पवित्रा महाडिक यांनी घेतला आहे. आता सम्राट महाडिक यांच्या उमेदवारीचा फटका नेमका कोणाला बसणार, याबाबतच राजकीय वर्तुळातून मंथन सुरू आहे.

इस्लामपूर मतदार संघात आ. जयंत पाटील यांच्याविरोधात कोण लढणार, यावर अद्याप शिक्कामोर्तब नाही. परंतु नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सदाभाऊ खोत हेच सध्यातरी दोन चांगले पर्याय भाजपपुढे आहेत. निवडणुकीसाठी अजून कालावधी असल्यामुळे अंतिम क्षणी नेमका कोण उमेदवार असणार, हे सांगता येत नाही.लोकसभा निवडणुकीच्या गणितावर विधानसभेची बेरीज-वजाबाकी ठरणार आहे. एकंदरीत सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटील यांच्या कासेगावातून त्यांना आव्हान देऊन आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवल्याची चर्चा आहे. 

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांनी मानसिंगराव नाईक यांना पाठिंबा देत उमेदवारी माघार घेतली होती. त्यामुळे शिवाजीराव नाईक यांचा पराभव झाला होता. यावेळी मानसिंगराव नाईक यांनी सत्यजित देशमुख यांच्यासाठी माघार घेऊन पैरा फेडावा.- जयदीप पाटील, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कृषी सेल, सांगली.