शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीप्रश्नी विधी विभागाचा सल्ला

By admin | Updated: December 10, 2014 23:46 IST

हालचाली गतिमान : छापा टाकून तपासणी करण्याची तयारी

सांगली : एलबीटी (स्थानिक संस्था कर) न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आता महापालिका प्रशासनाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. छापा टाकून तपासणी करण्याबाबतची तयारी पूर्ण झाली असली, तरी त्यात कायदेशीर कोणत्याही कमतरता नसाव्यात म्हणून विधी विभागाकडून सल्ला मागविण्यात आला आहे. अभिप्राय येताच कोणत्याहीक्षणी कारवाईला सुरुवात होणार आहे. महापालिका सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडली आहे. शहरातील विकासकामेही मोठ्या प्रमाणावर ठप्प आहेत. एलबीटी हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असल्याने त्यातच ११० कोटींची तूट निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांनी करावर बहिष्कार टाकल्यामुळेच एलबीटीच्या उत्पन्नात तूट दिसत आहे. कर न भरण्याबाबत आजही व्यापारी ठाम आहेत. त्यामुळे महापालिका व व्यापाऱ्यांत गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. आयुक्तांनी कायद्यातील तरतुदीद्वारे कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एलबीटी विभागामार्फत गत आठवड्यात १६ व्यापाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्यात आली आहे. आणखी ४० व्यापाऱ्यांवरही फौजदारी दाखल केली जाणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. त्यातच आता कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानांची झाडाझडती घेण्याची तयारी प्रशासकीय स्तरावर सुरू झाली आहे. यासाठीच विधी विभागाचा सल्ला मागविण्यात आला आहे. कायद्यातील तरतुदी पाहून त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. कायदेशीर बाजू भक्कम करूनच मैदानात उतरण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. शासनाकडे १५४ व्यापाऱ्यांच्या दफ्तर तपासणीचा प्रस्ताव यापूर्वीच पाठविण्यात आला आहे. त्यास मान्यता मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शासनाकडे मंजुरी मिळविण्यासाठी एक अधिकारी लवकरच नगरविकास विभागाकडे रवाना होणार असल्याचे समजते. शासनाची मंजुरी मिळाल्यास कारवाईला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)संघर्ष होणारएकीकडे महापालिकेने कारवाईची तयारी सुरू केली असतानाच, व्यापाऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. महापालिका कर्मचारीही प्रतिआंदोलनाच्या तयारीत आहेत. नगरसेवकांनीही प्रशासनाच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्यापारी व महापालिकेत जोरदार संघर्षाची चिन्हे दिसत आहेत.