शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

Sangli- नोकरी सोडून जगवतोय भटकी गाय, वासरं; १५ वर्षापासून कुमठ्याच्या बंडू पाटील यांची एकाकी झुंज

By श्रीनिवास नागे | Updated: April 10, 2023 13:04 IST

एसटी कंडक्टरची नोकरी सोडून निराधार भटक्या पशु पक्षाच्या संगोपनासाठी संसारावर तुळशीपत्र ठेऊन पंधरा वर्षापासून धडपड,  गोमातेच्या बचावासाठी मदतीची गरज 

प्रदीप पोतदार कवठे एकंद : शेतीला जोडधंदा असणाऱ्या पशुपालनाबाबत शेतकरी वर्गात कमालीची उदासीनता आहे. पशुखाद्याचे वाढते दर, औषध उपचार आणि कमी दूध उत्त्पादन यामुळे पशुपालन न परवडणारे आहे. दुधाचे उत्पादन कमी देणारी देशी गाय तर दुर्मिळच बनली आहे. असे वास्तव चित्र असताना भाकड झालेल्या, मरणाला टेकलेल्या, सोडून दिलेल्या भटक्या बेवारस गाय, वासरांच्या जगण्यासाठी कुमठे ता. तासगाव येथील विश्वनाथ उर्फ बंडू पाटील गेल्या पंधरा वर्षापासून एकाकीपणे झुंज देतोय.कुमठे गावापासून अडीच किलोमीटरवर उत्तरेकडे असणाऱ्या वडिलोपार्जित सात गुंठे जागेवर बेवारस वृद्ध गायींचा गोठाच त्यानं सांभाळला आहे. एसटी कंडक्टरची नोकरी सोडून निराधार भटक्या पशु पक्षाच्या संगोपनासाठी संसारावर तुळशीपत्र ठेऊन पंधरा वर्षापासून त्याची धडपड सुरू आहे. सध्या पन्नाशी पार केलेला विश्वनाथ उर्फ बंडू पाटील चाळीसहून अधिक म्हाताऱ्या, मारक्या, खोडील देशी गाईं वासरांच्या सांभाळासाठी अनेक आव्हानांना तोंड देत आहे. दुर्मिळ व नामशेष होत चाललेल्या देशी गोधनाचा सांभाळ करणारा बंडू पाटील गोमातेसाठी जणू "विश्वनाथ'' बनून गाय वासरांच्या संसारात रममाण झाला आहे.नेहमीच मळकटलेल्या पोशाखात असणाऱ्या बंडू पाटील यांची अव्याहतपणे सुरू असलेली स्वच्छ मनाची गोसेवा पांढरपेशी पोशाखातील, मतलबी समाजासाठी आदर्श देणारी आहे. मूक जनावराप्रती जपलेली आपुलकी समाजासाठी आदर्शवत आहे. गो संवर्धनाचे वेड असलेला हा अवलियाने समाजमनांना पाझर फुटेल असं काम निरपेक्ष निर्मळमनाने जोपासत आहे. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीची परिसरातील अनेकांनी दाद घेत कधी चाऱ्यासाठी, कधी निवाऱ्यासाठी मदत करतात. समाजातील काही दानशूर व्यक्तींनी सामाजिक बांधिलकीतून कुमठेतील मनोज पाटील हे चाऱ्यासाठी तर मनेराजुरीच्या नंदू पवार यांनी पाण्यासाठी बोअर मारून दिली आहे. बोअर मधील मोटार, कडबा कुट्टी मशीनसाठी इस्कॉन हरेकृष्ण भक्त यांनी मदत केली तर दीपक पाटील, प्रशांत पाटील, सावर्डेचे  प्रदीप माने, विनायक कदम यांच्या सह अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. 

गो मातेच्या संवर्धनासाठी पाठबळाची गरज जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून  गाई येतात. पण वृद्ध जनावरांची वाढणारी संख्या पाहता सांभाळण्यासाठी पुरेसा चारा, बंदिस्त निवारण असल्याने मोठी गैरसोय होत आहे. पडेल त्या संकटाला तोंड देत हात पसरत हा गोसंवर्धनाचे विश्व एकट्या विश्वनाथने आजवर पेलेले आहे. पण आता गरज आहे ती मदतीची. बंदिस्त निवारा, दैनंदिन चारा, जनावरांचे औषध उपचार यासाठी दानशूर, पशु प्रेमींनी, सामाजिक संस्थांनी तसेच शासन स्तरावरून मदत करण्याची आवश्यकता आहे.

"नफा तोट्याची बेरीज वजाबाकी करणाऱ्या मंडळींनी गायी, भाकड जनावरे सोडून दिल्या जातात. त्यांचा आधार देण्यासाठी माझा प्रयत्न सुरू असून हव्याहतपणे हे चालूच ठेवणार आहे.तरी गोमाता प्रेमींनी मदतीचा हात द्यावा. यातून माझ्या कामाला पाठबळ मिळेल असे आवाहन त्यांनी दैनिक लोकमतशी बोलताना केले.

टॅग्स :Sangliसांगलीcowगाय