शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

Lok Sabha Election 2019 आघाडीची फटकेबाजी; युतीची ‘टाईट फिल्डिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:42 IST

प्रताप महाडिक । लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : आघाडी धर्माचे पालन करीत पलूस-कडेगाव मतदारसंघातील काँग्रेस व राष्ट्रवादीने ‘स्वाभिमानी’ची ‘बॅट’ ...

प्रताप महाडिक ।लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : आघाडी धर्माचे पालन करीत पलूस-कडेगाव मतदारसंघातील काँग्रेस व राष्ट्रवादीने ‘स्वाभिमानी’ची ‘बॅट’ हातात घेऊन शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात भाजप-शिवसेनेविरोधात फटकेबाजी सुरू केली आहे, तर भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्यासाठी युतीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावली आहे.पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत कोणता उमेदवार आघाडी घेणार, यासाठी सुरू असलेली ही लढाई कदम, देशमुख व लाड कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेची ठरणार आहे.उमेदवारी दाखल करण्यापूर्वीच्या कालावधित विशाल पाटील व आमदार विश्वजित कदम यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. परंतु प्रत्यक्ष निवडणूक मैदानात उतरल्यावर विशाल पाटील यांनी कदम यांची कडेगावात जाऊन भेट घेतली आणि त्यांची मनधरणी करण्यात यश मिळविले. कदम यांनीही, माझीच उमेदवारी असे समजून कामाला लागा, असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे. त्यामुळे पलूस-कडेगावातील काँग्रेसचे, कदम यांचे कार्यकर्ते विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.राष्ट्रवादीही आघाडीधर्म पाळणार आणि विशाल पाटील यांना साथ देणार असे सांगून, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण लाड व जिल्हा परिषदेचे सदस्य शरद लाड यांनीही यंत्रणा कामाला लावली आहे.दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व संजय पाटील यांच्यात भाजपच्या उमेदवारीवरून चढाओढ होती. मात्र संजयकाका यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यात दिलजमाई झाली. भाजप कार्यकर्ते संजयकाकांच्या प्रचारात उतरले आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या पाठीशी गावोगावी कमी-जास्त प्रमाणात कार्यकर्ते असून, ‘एकच छंद गोपीचंद’ असा नारा ते देत आहेत.युती । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?नरेंद्र मोदी यांच्या नावाचा महिमा, जिल्हा परिषद व पलूस आणि कडेगाव पंचायत समितीत भाजपची सत्ता, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा सक्षम व पारदर्शी कारभार ही बलस्थाने भाजपकडे आहेत.युती । वीक पॉर्इंटस् काय आहेत?भाजपमधील अंतर्गत संघर्षाचा फटका महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांना बसणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीमुळे होणारी मतविभागणी महायुतीसाठी त्रासदायक आहे.आघाडी । प्लस पॉर्इंटस् काय आहेत?कडेगाव नगरपंचायत, पलूस नगरपरिषद, बहुतांशी ग्रामपंचायतींची सत्ता काँग्रेसकडे आहे. मोहनराव कदम विधानपरिषदेचे, डॉ. विश्वजित कदम विधानसभेचे आमदार आहेत. वसंतदादा घराण्याचा लोकांवर पगडा आहे.आघाडी । वीक पॉर्इंटस् काय आहेत?कदम घराणे व दादा घराण्यातील अंतर्गत संघर्षाचा पूर्वानुभव पाहता, विरोधकांना छुपा पाठिंबा. वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर, काँग्रेसचे चिन्ह मतपत्रिकेवर नसल्यामुळे काँग्रेसप्रेमी जनतेतून उमटलेले नाराजीचे सूर.मागच्या निवडणुकीत़़़२०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये डॉ. पतंगराव कदम (काँग्रेस) १,१२,५२३ मते (विजयी), तर पृथ्वीराज देशमुख (भाजप) यांना ८८,४८९ मते मिळाली होती. डॉ. कदम २४ हजार ३४ मतांनी विजयी झाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक