शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या आरत्या...

By admin | Updated: September 4, 2014 00:04 IST

निमंत्रणांना प्रतिसाद : देवाबरोबरच मतदारांनाही साकडे, उत्सवात वाढला राजकीय उत्साह

सांगली : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच गणेशोत्सव आल्याने सध्या राजकीय उत्साहाला उधाण आले आहे. एकाचवेळी कार्यकर्त्यांच्या रूपातील अनेक मतदारांची भेट आणि त्यांच्यानिमित्ताने देवाला साकडे घालण्याची संधी नेत्यांना मिळत आहे. उत्सवाचा काळ नेत्यांनी मतदारसंघातील मंडळांसाठी राखीव ठेवला असून, देवाच्या निमित्ताने मतदारराजासाठीही आरती ओवाळली जाणार आहे. सांगली जिल्ह्यात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गणेश मंडळांचे कार्यकर्ते, त्या त्या भागातील नागरिक उत्सवात दंग आहेत. उत्साहाचे वातावरण सर्वत्र असल्याने त्याचा परिणाम आता राजकीय वातावरणावरही झाला आहे. मंत्री, आमदार आणि आमदारकीसाठी धडपडत असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांचाही सहभाग आता सार्वजनिक उत्सवात वाढला आहे. अर्थात मंडळांकडूनच त्यांना निमंत्रणे दिली जात आहेत. ही निमंत्रणे बहुतांश नेत्यांकडून स्वीकारली जात आहेत. मंडळ व त्यांच्या कार्यकर्त्यांची मर्जी राखण्यातच नेतेपणाचे अस्तित्व असल्याची भावना राजकीय मंडळींच्या मनात आहे. म्हणूनच मंडळांच्या कार्यक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. सांगली, मिरजेतील नेत्यांमध्ये यासाठी चढाओढ सुरू आहे. या दोन्ही शहरात सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या अधिक आहे. सांगली, मिरजेप्रमाणेच इस्लामपूर, विटा, कवठेमहांकाळ, शिराळा, जत या तालुक्यांमध्येही गणेश मंडळांच्या आरत्यांसाठी नेत्यांना निमंत्रण दिले जात आहे. मंडळांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची मोठी संधी नेत्यांना चालून आली आहे. गणेशोत्सवानंतर पुन्हा नवरात्रोत्सवही येत आहे. त्यामुळे उत्सवांच्या गर्दीत नेत्यांचा उत्साहसुद्धा मंडळांच्या कार्यकर्त्यांइतकाच वाढत आहे. सांगली व मिरजेतील काही नेत्यांकडे दररोज तीन ते चार मंडळांची निमंत्रणे आहेत. उत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात दररोज पाच-सहा ठिकाणच्या आरत्यांना हजेरी लावावी लागणार आहे. नेत्यांच्या डायरीला मंडळांच्या निमंत्रणांची नोंद करण्यात आली आहे. उत्सव काळात अन्य राजकीय बैठका, मेळावे किंवा कार्यक्रमांना फाटा देण्यात आला आहे. प्राधान्याने उत्सवाकडे लक्ष दिले जात आहे. (प्रतिनिधी)निवडणुकीच्या तोंडावरच उत्सव आल्याने नेत्यांकडून देणगी वाढली आहे. हसतमुखाने कोणतीही तक्रार न करता नेत्यांकडून देणग्या दिल्या जात आहेत. मंडळांच्या कमानी, महाप्रसाद आणि इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी सढळ हाताने मदत केली जात असल्याचे चित्र आहे.कमानींवरही नेते गणेश मंडळांच्या अनेक कमानींवर सध्या इच्छुकांची छायाचित्रे झळकत आहेत. काही नेत्यांनी संस्थेच्या माध्यमातून मंडळांना जाहिरातस्वरुपात मदत केली आहे. त्यामुळे सांगली शहरातील गणेश मंडळांच्या कमानींच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे.