शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी फायनल; जागांचा निर्णय सांगलीत : अशोक चव्हाण-जयंत पाटील यांच्यात चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 01:11 IST

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यास काँग्रेसच्या नागपूर येथे झालेल्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत हिरवा कंदील दाखविण्यात आला. त्यामुळे स्वबळावर लढण्याच्या चर्चेला विराम मिळाला आहे. आता दोन्ही पक्षांनी किती जागांवर लढायचे, यावर दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांची शुक्रवारी रात्री बैठक झाली, पण जागा वाटपावर तोडगा निघू शकला नाही. सांगलीत स्थानिक पदाधिकाºयांनी ...

ठळक मुद्देनागपुरात पार्लमेंटरी बोर्डाची बैठक स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे चेंडू

सांगली : महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्यास काँग्रेसच्या नागपूर येथे झालेल्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत हिरवा कंदील दाखविण्यात आला. त्यामुळे स्वबळावर लढण्याच्या चर्चेला विराम मिळाला आहे. आता दोन्ही पक्षांनी किती जागांवर लढायचे, यावर दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांची शुक्रवारी रात्री बैठक झाली, पण जागा वाटपावर तोडगा निघू शकला नाही. सांगलीत स्थानिक पदाधिकाºयांनी एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय करावा, असे ठरले.

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीच्या हालचालीही गतिमान झाल्या होत्या. पण दोन्ही बाजूंनी इच्छुकांची संख्या पाहता वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या आदेशाकडे साºयांचेच लक्ष लागले होते. गुरुवारी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक नागपूर येथे होती. या बैठकीत महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पार्लमेंटरी बोर्डासमोर काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीचा अहवाल सादर केला.

या बैठकीला प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश युवकचे अध्यक्ष आ. विश्वजित कदम, आ. मोहनराव कदम, माजी मंत्री सतेज पाटील, हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील उपस्थित होते.बैठकीत महापालिका क्षेत्रातील कॉँग्रेस पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. काँग्रेसने स्वबळावर लढावे, असा सूरही काही नेत्यांनी आळवला होता. पण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याला नकार देत राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचे आदेश स्थानिक नेत्यांना दिले. त्यामुळे राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीबाबत काँग्रेसकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. आघाडी फायनल झाल्याने आता कोण किती जागा लढवायच्या? हा प्रश्न बाकी आहे. त्यासाठी शुक्रवारी अशोक चव्हाण व जयंत पाटील यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाचा तिढा सांगलीतच सोडविला जावा, अशी काँग्रेस नेत्यांची भूमिका आहे. काँग्रेसकडील हक्काच्या जागा कायम ठेवाव्यात, असा आग्रह स्थानिक नेत्यांनी धरला होता. त्याला पार्लमेंटरी बोर्डानेही सहमती दर्शविली आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या हक्काच्या जागांचा निर्णय सुरूवातीला घ्यावा. काँग्रेसच्या ज्या जागांवर वाद नाही, त्या जागा आधी जाहीर कराव्यात, अशा सूचनाही पार्लमेंटरी बोर्डाने स्थानिक नेत्यांना केल्या. काँग्रेसअंतर्गत ज्या जागांवर इच्छुकांची संख्या अधिक आहे आणि या जागांवर तोडगा काढण्यात स्थानिक नेत्यांना यश आले नाही, तर या जागांचा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण घेतील, असा निर्णय बैठकीत करण्यात आला. चव्हाण यांनीही अशा वादाच्या जागांचा अहवाल माझ्याकडे पाठवा, मी त्यावर निर्णय घेऊन कोणाला उमेदवारी द्यायची, हे ठरवू, असे स्पष्ट केले.

आघाडीतील जागा वाटपाबाबत शुक्रवारी रात्री अशोक चव्हाण व जयंत पाटील यांच्यासह सांगलीतील काँग्रेसच्या नेतेमंडळींची भोजनावेळी चर्चा झाली. पण दोन्ही बाजूंनी समाधानकारक तोडगा निघू शकला नाही. सांगलीत दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र बसून जागा वाटपावर चर्चा करावी, असा निर्णयही झाला. त्यामुळे पुन्हा एकदा सांगलीत दोन्ही काँग्रेसची चर्चा होणार आहे.राष्ट्रवादी ३५ जागांवर ठाममहापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला किमान ३५ जागा मिळाव्यात, अशी स्थानिक नेत्यांची अपेक्षा आहे. राष्ट्रवादीचे गतवेळचे संख्याबळ १९ असले तरी, धनपाल खोत, इद्रिस नायकवडी गट राष्ट्रवादीत आल्याने ताकद वाढल्याचा दावा केला जात आहे. सध्या राष्ट्रवादीकडे २७ नगरसेवक आहेत, तर आणखी आठ जागांवर मातब्बर उमेदवार असल्याने ३५ जागा मिळाल्या तरच काँग्रेससोबत आघाडी व्हावी, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवावा, असा सूर राष्ट्रवादीतून निघत आहे.सांगलीत आज बैठकदोन्ही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी जागा वाटपाचा चेंडू पुन्हा स्थानिक पातळीवर टोलविला आहे. या पार्श्वभूमीवर जागा वाटपासंदर्भात शुक्रवारी रात्री दोन्ही काँग्रेसच्या पदाधिकाºयांची सांगलीत बैठक होण्याची शक्यता आहे, असे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक