शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी असेसमेंट व्यापाऱ्यांच्या मुळावर!

By admin | Updated: April 2, 2017 23:41 IST

राज्य शासनाकडून व्यापाऱ्यांना ठेंगा : मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढीने महापालिकेला दिलासा

सांगली : एलबीटी असेसमेंट तपासणीवरून महापालिका आणि व्यापारी संघटनांत गेल्या चार वर्षापासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष आणखी एक वर्ष सुरूच राहणार असे दिसते. शासनानेच एलबीटीअंतर्गत अभय योजनेतील दाखल असेसमेंटच्या तपासणीसाठी मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मध्यंतरी व्यापाऱ्यांच्या आंदोलनावेळी असेसमेंट तपासणी रद्द होण्याची आशा पल्लवित झाली होती. पण आता शासनानेच व्यापाऱ्यांना ठेंगा दाखवत, वर्षभराची मुदतवाढ दिल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील १२ हजार ८०० व्यापाऱ्यांपैकी ९ हजार लोकांनी एलबीटीअंतर्गत नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या व्यापाऱ्यांमध्ये केवळ साडेपाच हजारजणांनी विवरणपत्र भरून कर जमा केला आहे. उर्वरित साडेतीन हजार लोकांनी कर भरलेला नाही. याशिवाय ३ हजार ८०० लोकांनी करास पात्र असतानाही अद्याप नोंदणीच केलेली नाही. त्यामुळे अशा चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. केवळ नोटिसा बजाविण्यापलीकडे प्रशासन जाऊ शकले नाही. एलबीटीपोटी ५० कोटी रुपये व्यापाऱ्यांकडे थकीत असल्याचा दावा महापालिका करीत आहे. पालिकेने सीए पॅनेल नियुक्त करून एलबीटीच्या विवरणपत्राची तपासणी हाती घेतली आहे. साडेपाच हजार व्यापाऱ्यांच्या विवरणपत्राची तपासणी केल्यास कोट्यवधीची रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा होऊ शकते, असा पालिकेचा व्होरा आहे. त्यासाठी चार हजार व्यापाऱ्यांना असेसमेंट तपासणीला उपस्थित राहण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. येत्या मार्चपर्यंत अभय योजनेतील व्यापाऱ्यांची असेसमेंट तपासणीची मुदत होती. त्यामुळे पालिकेने फेब्रुवारीपासून व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. त्याला विरोध करण्यासाठी व्यापारी, उद्योजक संघटना एकत्र आल्या. त्यांनी सांगलीत उपोषण सुरू केले. दोन दिवसांतच खासदार संजयकाका पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर व्यापाऱ्यांचे उपोषण मागे घेतले. एलबीटी असेसमेंट तपासणी हा व्यापाऱ्यांच्या आंदोलनातील कळीचा मुद्दा होता. असेसमेंट तपासणीवेळी व्यापाऱ्यांची छळवणूक होते, असा संघटनांचा आरोप आहे. पण त्यावरही महापालिका तोडगा काढण्यास तयार आहे. तरीही व्यापारी तपासणीसाठी कागदपत्रे सादर करण्यास नकार देत आहेत. त्यात मार्च २०१७ ची मुदत संपल्यानंतर शासनाकडून पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही, अशी व्यापाऱ्यांची समजूत होती. पण ती फोल ठरली आहे. राज्य शासनानेच एलबीटी असेसमेंट तपासणीसाठी एक वर्षाची मुदतवाढ देत व्यापाऱ्यांना दणका दिला आहे. मुदतवाढीचे पत्रही महापालिकेला प्राप्त झाले आहे. व्यापाऱ्यांच्या आंदोलनावेळी केलेल्या मागण्यांबाबत महापालिकेने राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागविले होते. पण त्यावर शासनाने कोणतीच हालचाल केलेली नाही. त्यामुळे आता महापालिकेला एलबीटी वसुलीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार महापालिकेने व्यापाऱ्यांना नोटिसा बजाविण्यास सुरूवात केली आहे. त्यालाही व्यापारी संघटनेने विरोध केला आहे. यातून महापालिका व व्यापाऱ्यांत पुन्हा संघर्षाचीच चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)