कुपवाड : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेल्या २०२१ च्या डिप्लोमा इंजिनिअरिंग परीक्षेमध्ये लठ्ठे पाॅलिटेक्निक काॅलेजने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली. काॅलेजचा अंतिम वर्षाचा निकाल ९८.८१ टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्य अण्णासाहेब गाजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, लठ्ठे पाॅलिटेक्निक काॅलेजचा प्रथम वर्षाचा निकाल ९१.६६ टक्के, तर दि्वतीय वर्षाचा निकाल ९४.६४ टक्के लागला आहे. बोर्डाच्या परीक्षेस एकूण ९२० विद्यार्थी बसले होते. सिव्हिल १९, काॅम्प्युटर ९१, इलेक्ट्रिकल ३१, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ६२, मेकॅनिकल विभागातील ७६ या मुलांनी बोर्डाच्या परीक्षेत विविध विषयात १०० पैकी १०० गुण मिळविलेले आहेत.
गुणवत्ता यादीमध्ये सिव्हिल शाखेत अनुराग नागवे, अजिंक्य कोल्हापुरे, प्रतीक सावंत, वैभव रजपूत; काॅम्प्युटर शाखेतून नेहा पवार, ऋचा खेडकर; इलेक्ट्रिकल शाखेत श्रेयश कोरे, आकांक्षा पुराणिक, स्नेहल पाटील; इलेक्ट्राॅनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन शाखेत दीपाली खटावे, शिवम शहा, ऋतुजा यादव पाटील; तर मेकॅनिकल शाखेत प्रथमेश बेले, सानिका चौगुले, प्रज्ज्वल नरुटे यांनी यश संपादन केले.
प्राचार्य अण्णासाहेब गाजी, उपप्राचार्य राजेंद्र मेंच, विभागप्रमुख, विषय शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन शांतिनाथ कांते, ऑनररी सेक्रेटरी सुहास पाटील यांनी विद्यार्थी, शिक्षकांचे अभिनंदन केले.