शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कवठेमहांकाळमध्ये ‘एनएसयुआय’चा मोर्चा

By admin | Updated: November 6, 2015 23:54 IST

तहसीलदारांना निवेदन : दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क परत देण्याची मागणी

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथे विविध शैक्षणिक मागण्यांसाठी तालुकाध्यक्ष विशाल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थ्यांनी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी निवासी नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांना निवेदन दिले़सकाळी दहा वाजता पीव्हीपी महाविद्यालयापासून मोर्चाला सुरूवात झाली़ मोर्च्यात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ‘शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘भाजप सरकार हाय हाय’, ‘शैक्षणिक फी परत द्या’ ‘एसटी पास मोफत द्या’, ‘कोण म्हणतंय देत न्हाय, घेतल्याशिवाय राहत न्हाय’, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला़ मुख्य रस्त्यावरून एसटी स्टँड, अंबिका कॉर्नर, काँग्रेस भवन मार्गे मोर्चा तहसील कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला़ यावेळी एनएसयुआयचे तालुकाध्यक्ष विशाल शिंदे म्हणाले की, भाजपचे सरकार पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दुजाभावाची वागणूक देत आहे. दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना अद्याप शैक्षणिक फी परत दिलेली नाही. तसेच एसटी पासही मोफत दिला नाही. भाजपचे सरकार विद्यार्थ्यांचे प्रश्न गांभीर्याने घेत नाही़ गेंड्याची कातडी पांघरलेल्या या सरकारला वठणीवर आणण्यासाठी कवठेमहांकाळसारख्या दुष्काळी भागातून आम्ही एनएसयुआयतर्फे आंदोलन करणार आहोत़ यावेळी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना एसटी पास मोफत द्यावा, त्यांची शैक्षणिक फी परत द्यावी आदी मागण्यांचे निवेदन एनएसयुआयचे तालुकाध्यक्ष विशाल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवासी नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांना देण्यात आले़या मोर्च्यात आकाश घोरपडे, विकास शिंदे, शिवाजी सरगर, अस्मिता देशमुख, अंजली शिंदे, प्रियांका वाघमारे, योगिता इंगळे, शुभम भोरे, सूरज शेजाळ, प्रज्ज्वल पाटील, युवराज पाटील, आशू पाटील, विशाल जाधव, अजिंक्य कारंडे, प्रशांत जगताप यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते. (वार्ताहर)सरकारला धडा शिकवूभाजप सरकारने डिसेंबरअखेर दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना एसटी पास मोफत दिला नाही, तसेच चालू शैक्षणिक वर्षात शैक्षणिक फी परत दिली नाही, तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हाध्यक्ष राजीव मोरे यांच्या सहकार्याने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून भाजप सरकारला धडा शिकवू, असा इशाराही विशाल शिंदे यांनी दिला़