शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘महसूल’च्या वरदहस्तामुळे भूखंड माफियाराज: इस्लामपुरातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 23:17 IST

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : इस्लामपूर शहराच्या चारही दिशेला फकिरांची समाधीस्थळे आहेत. मात्र महसूल विभागातील काहींनी काळ्याचे पांढरे करून या देवस्थानांच्या जागांची खरेदीपत्रे केली आहेत. राजेबागेश्वर देवस्थानाचीही अशीच परिस्थिती आहे. भोई समाजाने पूजाअर्चेच्या निमित्ताने त्यांच्या नावावर असलेल्या भूखंडांची विल्हेवाट लावली आहे.शहराच्या दक्षिणेस राजेबागेश्वर देवस्थान आहे. गुढीपाडव्याला येथे मोठी यात्रा ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : इस्लामपूर शहराच्या चारही दिशेला फकिरांची समाधीस्थळे आहेत. मात्र महसूल विभागातील काहींनी काळ्याचे पांढरे करून या देवस्थानांच्या जागांची खरेदीपत्रे केली आहेत. राजेबागेश्वर देवस्थानाचीही अशीच परिस्थिती आहे. भोई समाजाने पूजाअर्चेच्या निमित्ताने त्यांच्या नावावर असलेल्या भूखंडांची विल्हेवाट लावली आहे.शहराच्या दक्षिणेस राजेबागेश्वर देवस्थान आहे. गुढीपाडव्याला येथे मोठी यात्रा भरते. इस्लामपूर-बहे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या जागांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे राजेबागेश्वर परिसरातील मोकळ्या जागांवर धनदांडग्यांचा डोळा आहे. इस्लामपूर शहराला गुंठेवारीचा प्रश्न भेडसावत आहे. नियोजित विकास आराखडा लाल फितीत अडकला आहे. त्यामुळे नगरपालिकेपासून महसूल विभागातील वरदहस्तामुळे भूखंड माफिया फोफावले आहेत. सर्वसामान्यांनी कर्जे काढून खरेदी केलेल्या जागांवर काहींनी अतिक्रमण करून तारेची कुंपणे घातली आहेत. पोलिसांत तक्रारी करूनही, संबंधितांवर कारवाई झालेली नाही. उलट न्यायालयीन लढा देण्याचा सल्ला दिला जात आहे.देवस्थान परिसरात पुजाºयांच्या उदरनिर्वाहासाठी शेतजमीन दिली आहे. परंतु मंदिरांचा विकास होण्यापेक्षा पुजाºयांनी स्वत:चेच उत्पन्न वाढवून घेतले आहे. याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ज्यांच्याकडे या मंदिराची देखभाल व पूजेचा मान आहे, तेच आता मालक झाले आहेत. ज्या देवस्थानच्या नावाने जमिनी आहेत, त्या बेकायदेशीरपणे विकल्या जात आहेत. राजेबागेश्वर परिसरात भोई समाजाने पूजेचा मान घेऊन केवळ मलिदा लाटण्याचाच उद्योग केला आहे. ही जागा भोई समाजाची असल्याचा दावा करणारे अशोक भोई आणि डॉ. राहुल कुंडले यांनी घूमजाव केले आहे.