शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सांगली-इस्लामपूर मार्गावर लागणार दिवे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 23:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सांगली - इस्लामपूर या रस्त्यावरील असंख्य खड्ड्यांवर प्रकाश टाकण्यासाठी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी १७ आॅक्टोबर रोजी या संपूर्ण मार्गावर सर्व गावांच्या सहभागाने दिवे लावण्यात येणार आहेत. सर्वपक्षीय लोकांच्या सहभागातून खड्डेमुक्तीसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती रस्ता बचाव कृती समितीचे पदाधिकारी पृथ्वीराज पवार, अ‍ॅड. श्रीकांत ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सांगली - इस्लामपूर या रस्त्यावरील असंख्य खड्ड्यांवर प्रकाश टाकण्यासाठी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी १७ आॅक्टोबर रोजी या संपूर्ण मार्गावर सर्व गावांच्या सहभागाने दिवे लावण्यात येणार आहेत. सर्वपक्षीय लोकांच्या सहभागातून खड्डेमुक्तीसाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती रस्ता बचाव कृती समितीचे पदाधिकारी पृथ्वीराज पवार, अ‍ॅड. श्रीकांत जाधव, सतीश साखळकर, अ‍ॅड. अमित शिंदे, राहुल थोटे यांनी दिली.त्यांनी सांगितले की, सांगली-इस्लामपूर रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे. या रस्त्यावर सतत अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर कित्येकजण जखमी झाले आहेत. नागरिकांनी वारंवार तक्रारी करून तसेच आंदोलने करुनही सरकार याची दखल घेत नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. या रस्त्याचे काम म्हणजे निकृष्टपणाचा आदर्श नमुनाच आहे. जनतेच्या सहनशीतलतेचा अंत झाल्याने काही सामाजिक संघटना न्यायालयात गेल्या आहेत. तसेच सर्व सामाजिक संघटना एकत्र येऊन यापुढे जोरदार आंदोलन केले जाणार आहे.सांगली ते पेठपर्यंतच्या सर्व गावांतील सर्व सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आहेत. दिवाळीदिवशी आंदोलनाची अनोख्या पध्दतीने सुरुवात केली जाणार आहे. रास्ता रोको, निदर्शने, धरणे याचा परिणाम होत नसल्याने, गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग आणण्यासाठी या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये दिवे लावले जाणार आहेत. सर्व गावे यात सहभागी होणार आहेत. या दिवशी सायंकाळी सात वाजल्यानंतर सर्वजण रस्त्यावर येऊन दिवे लावून शासनाचा निषेध करणार आहेत.आंदोलनाचे संयोजन महेश खराडे, कुमार पाटील, प्रदीप कांबळे, आनंद देसाई, आयुब पटेल, सचिन चोपडे, अमर पडळकर, मयूर घोडके, युसूफ मिस्त्री, विजय पवार, विजय डांगे, संजय कोले, महावीर चव्हाण, अश्रफ वांकर, संजय बेले, सुनील फराटे, अ‍ॅड. विजय खरात यांच्यासह कार्यकर्ते करीत आहेत.