शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये लूटमार, सिग्नल यंत्रणेत बिघाड केल्याचे निष्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 05:42 IST

मिरज (जि. सांगली) : सिग्नल यंत्रणेत बिघाड करून मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस जेजुरीजवळ अडवून चोरट्यांनी चार प्रवाशांचा दोन लाखांचा ऐवज लुटला.

मिरज (जि. सांगली) : सिग्नल यंत्रणेत बिघाड करून मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस जेजुरीजवळ अडवून चोरट्यांनी चार प्रवाशांचा दोन लाखांचा ऐवज लुटला. गुरुवारी मध्यरात्री झालेल्या या लूटमारीबाबत मिरज रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेत बिघाड करुन ठेवला असल्याने सिग्नल मिळाला नाही, त्यामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेस राजेवाडी स्थानकावर थांबविण्यात आली. गाडी अचानक थांबल्याने प्रवाशांनी खिडक्या उघडून बाहेर डोकावण्यास सुरुवात केली. यावेळी अंधारात दबा धरून बसलेल्या चोरट्यांच्या आठ ते दहा जणांच्या टोळीने महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पलायन केले.लूटमारीनंतर रेल्वेत मोठा गोंधळ सुरू झाला. रेल्वे परत सुरू झाल्यानंतर संतप्त प्रवाशांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली. मात्र प्रवाशांची तक्रार घेण्यासाठी पोलीस उपलब्ध नसल्याने प्रवाशांनी पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. गाडी मिरजेत व कोल्हापुरात आल्यानंतर चार प्रवाशांनी रेल्वे पोलिसांत चोरीची तक्रार दिली. चोरट्यांच्या टोळीने आणखी काही प्रवाशांचे दागिने लुटल्याचाही अंदाज आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे़ प्रवाशी असुरक्षित असल्याची प्रतिक्रिया सर्वस्तरातून उमटत आहे़ आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी होत आहे़।भोईवाडा, वांद्रे व डोंबिवलीतील प्रवाशांना लुटलेएस-३ बोगीतील कृष्णा श्रीकांत माने (वय १७, रा. भोईवाडा, मुंबई) यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची दीड तोळे सोन्याची चेन, एस-५ बोगीतील सुचित्रा प्रल्हाद विटेकरी (३४, रा. निपाणी रोड, चिकोडी) यांच्या गळ्यातील ४५ हजार किमतीचे दीड तोळे सोन्याचे मंगळसूत्र, एस-८ बोगीतील विजया केतन राजगुरू (४५, रा, डोंबिवली) यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे मंगळसूत्र, एस-१ बोगीतील नूरजहॉँ सैफुद्दीन शेख (५०, रा. वांद्रे, मुंबई) यांच्या गळ्यातील ४५ हजारांचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी खिडकीतून खेचून नेले.