शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

काँग्रेसला सतावतेय अनुभवी नेत्यांची उणीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:16 IST

अविनाश कोळी । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कधीकाळी दिग्गज, अनुभवी नेत्यांचा भरणा असलेल्या काँग्रेस-राष्टÑवादीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनुभवी, ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कधीकाळी दिग्गज, अनुभवी नेत्यांचा भरणा असलेल्या काँग्रेस-राष्टÑवादीला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अनुभवी, ज्येष्ठ नेत्यांची उणीव भासणार आहे. काँग्रेसची बहुतांश मतदारसंघातील सूत्रे दुसऱ्या फळीच्या हाती गेली असून, राष्टÑवादीची अवस्थाही फारशी वेगळी नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या दुसºया फळीतील नेत्यांचे कौशल्य व ताकद पणाला लागणार आहे.सांगली जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांच्या काळात अनेक दिग्गज नेत्यांचे निधन झाले. त्यामुळे एक मोठी पोकळी आघाडीत निर्माण झाली आहे. माजी मंत्री पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख, आर. आर. पाटील, मदन पाटील, माजी आमदार हाफिज धत्तुरे, विलासराव शिंदे, इलियास नायकवडी अशा दिग्गज नेत्यांचे निधन आघाडीला धक्का देऊन गेले. अचानक इतकी मोठी पोकळी निर्माण झाल्याने आघाडीत चिंतेचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीतही हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र या राजकीय पोकळीची सर्वाधिक चिंता विधानसभा निवडणुकीत सतावणार आहे. राष्टÑवादीतून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसमधून माजी आमदार सदाशिवराव पाटील हे दोनच ज्येष्ठ नेते सध्या आघाडीत आहेत. तरीही दोन्ही नेत्यांना त्यांच्या मतदारसंघातच अडकविण्याची खेळी भाजपकडून खेळली जाणार असल्याने, अन्य मतदारसंघात दुसºया फळीच्या ताकदीची परीक्षा होणार आहे.सहा वर्षापूर्वी राष्टÑवादीतून अनेक दिग्गज नेते भाजप व शिवसेनेत गेले. यामध्ये खासदार संजयकाका पाटील, आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, पृथ्वीराज देशमुख, अजितराव घोरपडे, दिनकर पाटील आदी नेत्यांचा समावेश आहे. दिग्गज नेत्यांची फळी अन्य पक्षात गेल्यानंतर राष्टÑवादीला मोठा दणका बसला. काँग्रेसपाठोपाठ त्यांंच्या ताकदीचा आलेखही अचानक खाली आला. त्यातही पक्षाच्या अस्तित्वाची धडपड उर्वरित नेत्यांकडून सुरू होती, मात्र दिग्गज नेत्यांच्या निधनाने पुन्हा धक्के बसत राहिले. जिल्ह्यातील सध्याची काँग्रेस-आघाडीची ताकद फार मोठी नाही. भाजपने काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यातील आठपैकी चार, तर शिवसेनेने एक विधानसभा मतदारसंघ हस्तगत केला. तासगाव-कवठेमहांकाळ, वाळवा आणि पलूस-कडेगाव हे तीनच मतदारसंघ आघाडीने राखले. यंदा हे मतदारसंघही खेचण्याची जोरदार तयारी भाजपने केली आहे. आघाडीत अनुभवी, ज्येष्ठ नेत्यांची उणीव तीव्र होत असतानाच, भाजपकडे ज्येष्ठ, अनुभवी नेत्यांची ताकद वाढत आहे. त्यामुळे आघाडी आणि युती यांच्या ताकदीमधील अंतर मोठे होत आहे.या नेत्यांकडे राहणार लक्ष...शिराळ्यात शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित देशमुख, सांगलीत मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील, वसंतदादांचे नातू विशाल पाटील, तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात आर. आर. पाटील यांच्या पत्नी आ. सुमनताई पाटील, त्यांचे पुत्र रोहित पाटील, पलूस-कडेगावमध्ये पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम या दुसºया फळीतील नेत्यांकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. त्यांच्या राजकीय कौशल्याची तसेच ताकदीची परीक्षा घेणारी ही निवडणूक आहे.भाजपच्या वाढत्या ताकदीची आघाडीस चिंताजिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत भाजपने सर्व महत्त्वाच्या संस्था ताब्यात घेऊन आघाडीला कमकुवत केले असताना, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी आघाडीचे उरले-सुरले अस्तित्व संपुष्टात आणण्याची रणनीती आखली आहे. आघााडीकडे असलेल्या तीन जागा तरी ताकदीने लढविण्याबाबत आघाडी प्रयत्नशील असली तरी, अन्य मतदारसंघात त्यांच्या लढतीचे भवितव्य दुसºया फळीवर अवलंबून आहे.