शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आळसंद येथे ३० तोळे सोन्याचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:13 IST

विटा : आळसंद (ता. खानापूर) येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण पांडुरंग कुंभार यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख ...

विटा : आळसंद (ता. खानापूर) येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण पांडुरंग कुंभार यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख २० हजार रूपयांसह सुमारे २५ ते ३० तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत विटा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.आळसंद येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण (तात्या) कुंभार हे मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. सध्या ते सेवानिवृत्त झाले असून, ते पत्नीसह आळसंद येथील लिंगेश्वर मठाशेजारी वास्तव्यास होते. रविवारी कुंभार व त्यांची पत्नी घराला कुलूप लावून परगावी कामानिमित्त गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी भरदुपारी कुंभार यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी लोखंडी कपाटाचे कुलूप कटावणीने तोडून रोख २० हजार रूपयांसह सुमारे २५ ते ३० तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.कुंभार यांच्या पत्नी लीला लक्ष्मण कुंभार या आळसंद येथे आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी विटा येथे थांबलेले पती लक्ष्मण कुंभार यांना माहिती दिली. यावेळी कुंभार घरी आल्यानंतर त्यांनी पाहणी केली असता चोरट्यांनी रोख २० हजार रूपयांसह सुमारे बाजार भावाप्रमाणे ८ लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे निदर्शनास आले. यावेळी चोरट्यांनी वापरलेली कटावणी व अन्य साहित्य तिथेच खोलीत टाकून गेल्याचे दिसून आले.आळसंद येथे भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कुंभार यांच्या घरी गेल्या सहा माहिन्यांपूर्वीही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता. परंतु शेजाऱ्यांमुळे हा प्रयत्न अयशस्वी झाला होता. रविवारी चोरट्यांनी घरी कुणी नसल्याचे बघून सुमारे ८ लाख रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. याप्रकरणी विटा पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.