शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

कामगार विमा महामंडळास खासगी डॉक्टरांकडून ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:45 IST

महापालिका क्षेत्रासह लगतच्या भागातील सेवा बंद केलेल्यांसह नवीन वैद्यकीय व्यावसायिकांनी या सेवेकडे पाठ फिरविली असल्याने महापालिका आणि लगतच्या औद्योगिक कामगारांना चांगली सेवा मिळणे आता कठीण होणार आहे़

ठळक मुद्देकामगार यांना मल्टिस्पेशालिटीच्या सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे़ ही वर्गवारी त्वरित बंद करून समान सुविधा मिळाव्यात, अशी मागणी होत आहे.

महालिंग सलगर ।कुपवाड : महापालिका क्षेत्रालगतच्या औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना चांगल्या रुग्णालयाची सोय व्हावी, या उद्देशाने खासगी रुग्णालयांना राज्य कामगार विमा महामंडळाकडून (इएसआयसी) नुकतेच आवाहन करण्यात आले होते़. मात्र थकीत बिले, इएसआयसीच्या कर्मचाऱ्यांकडून मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून नकारघंटा मिळाली आहे.

महापालिका क्षेत्रासह लगतच्या भागातील सेवा बंद केलेल्यांसह नवीन वैद्यकीय व्यावसायिकांनी या सेवेकडे पाठ फिरविली असल्याने महापालिका आणि लगतच्या औद्योगिक कामगारांना चांगली सेवा मिळणे आता कठीण होणार आहे़ या रुग्णालयाचा कामगारांचा चांगला उपयोग होतो. मात्र, प्रशासनाच्या कुचकामी कारभारामुळे खासगी क्षेत्रातील डॉक्टरांची या रुग्णालयाकडील ओढ कमी झाली आहे.जिल्ह्यात एमआयडीसी, सहकारी औद्योगिक वसाहती, ग्रामीण भागातील विविध उद्योग आणि खासगी क्षेत्रातील सुमारे वीस लाख कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांची नोंदणी राज्य कामगार विमा महामंडळाकडे (इएसआयसी) आहे़ याबदल्यात हे नोंदणीकृत कामगार आणि कुटुंबीयांना इएसआयसीकडून चांगली वैद्यकीय सेवा पुरविण्याची तरतूद कायद्यात आहे़

इएसआयसीला सध्या नवीन तरतुदीनुसार व्यवस्थापन आणि कामगारांनी मिळून चार टक्के रक्कम भरणा करण्याची सक्ती केली आहे़. व्यवस्थापनाने एक दिवस जरी हा विम्याचा भरणा करण्यास दिरंगाई केली तरी त्वरित कारवाई होते.

मात्र, विम्याच्या रकमेचा भरणा करूनही कामगारांना म्हणाव्या तशा सुविधा मिळत नाहीत. इएसआयसीने गाजावाजा करत सांगली आणि कुपवाडमध्ये सुरू केलेल्या अकरा रुग्णालयांना त्यांची थकीत बिले न मिळाल्याने त्यांनी कामगारांची सेवा बंद केली आहे़, तसेच मर्जीतील काही ठराविक सुरू असलेल्या रुग्णालयांतून कामगारांना सेवा मिळण्याऐवजी अपमानच पदरी पडत आहे, असा आरोप होत आहे. सध्याच्या कालखंडात कामगारांना या सेवेचा चांगला फायदा होणे गरजेचे असताना त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.

या पार्श्वभूमीवर सेवा बंद केलेल्या आणि नव्याने सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रुग्णालयांसाठी इएसआयसीकडून जाहिरातीद्वारे आवाहन करण्यात आले होते. मात्र, थकीत बिले आणि अपमानास्पद वागणुकीला कंटाळलेल्या खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडून या आवाहनास अतिशय कमी प्रतिसाद मिळाला आहे. इएसआयसीची सेवा नाकारलेल्या अकरा व्यावसायिकांनी या जाहिरातीची दखलच घेतली नाही़. नव्यांनीही पाठ फिरविली आहे़ हा चिंतेचा विषय बनला आहे.

 

‘इएसआयसी’चा : जावईशोधराज्य कामगार विमा महामंडळाने नवा जावईशोध लावला असून, यामध्ये महिन्याचा कालावधी गृहीत धरून जुना आणि नवा अशी अन्यायी वर्गवारी केली गेली आहे. त्यामुळे नवीन आयटीआय पूर्ण केलेली मुले आणि नव्याने काम करणारा होतकरू गरीब कामगार यांना मल्टिस्पेशालिटीच्या सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे़ ही वर्गवारी त्वरित बंद करून समान सुविधा मिळाव्यात, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलSangliसांगली