शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

कुंडलच्या मुलीचा टॉवेलने फास बसून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 00:33 IST

पलूस : कुंडल (ता. पलूस) येथील अक्षरा अमोल जाधव (वय ११) या मुलीचा खेळत असताना गळ्याला टॉवेलचा फास बसल्याने ...

पलूस : कुंडल (ता. पलूस) येथील अक्षरा अमोल जाधव (वय ११) या मुलीचा खेळत असताना गळ्याला टॉवेलचा फास बसल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. ३) भोपाळ (मध्य प्रदेश) येथे घडली. शनिवारी दुपारी कुंडल येथे तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.कुंडल येथील अमोल जाधव हे भारतीय लष्करात सेवा बजावत आहेत. दोन वर्षांपासून ते भोपाळ (मध्य प्रदेश) येथे कर्तव्यावर आहेत. त्यांच्याबरोबर पत्नी पल्लवी, मुलगी अक्षरा व मुलगा शिवम (वय ७) हेही भोपाळ येथे सोबत राहतात. अक्षरा ही सैन्यदलाच्या शाळेत पाचवीच्या वर्गात शिकत होती. गुरुवारी (दि. ३) सकाळी नेहमीप्रमाणे अमोल कर्तव्यावर गेले, तर काही वेळाने त्यांची पत्नी पल्लवी याही शिवणक्लाससाठी बाहेर पडल्या.सध्या नवरात्रीची सुटी असल्याने अक्षरा व शिवम् हे बहीण-भाऊ घरात खेळत होते. खेळता-खेळता अक्षरा खिडकीवर चढली. खिडकीवर असणाऱ्या टॉवेलचा तिच्या गळ्याला फास बसला आणि तोल जाऊन ती खिडकीला लटकली. हे पाहून लहानग्या शिवमला काहीच कळेना. त्याने बहिणीला हाक मारली; पण ती काहीच उत्तर देत नाही हे पाहून त्याने शेजारीच राहणाºया महिलेला बोलावले. त्यांनी अमोल यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यांनी तत्काळ येऊन अक्षराला सैन्य दलाच्या रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.उत्तरीय चाचणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवारी तिचा मृतदेह घेऊन जाधव कुटुंबीय कुंडल येथे पोहोचले. दुपारी शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.