शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

दारूबंदीसाठी कुमठेकर रणरागिणी एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककवठेएकंद : कुमठे (ता. तासगाव) येथे संपूर्ण गावात दारूबंदी व्हावी, दारूच्या विळख्यातून समाज व भावी पिढी मुक्त व्हावी यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेतला आहे. आज मंगळवार, दि. १२ रोजी मतदानातून ‘बाटली आडवी’ करून ऐतिहासिक क्रांती गावच्या रणरागिनी करणार आहेत.महिलांच्या या विधायक कार्याला युवकांतून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर ...

लोकमत न्यूज नेटवर्ककवठेएकंद : कुमठे (ता. तासगाव) येथे संपूर्ण गावात दारूबंदी व्हावी, दारूच्या विळख्यातून समाज व भावी पिढी मुक्त व्हावी यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेतला आहे. आज मंगळवार, दि. १२ रोजी मतदानातून ‘बाटली आडवी’ करून ऐतिहासिक क्रांती गावच्या रणरागिनी करणार आहेत.महिलांच्या या विधायक कार्याला युवकांतून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर ग्रामस्थ, बंधू-भगिनी, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व सर्व पक्षीय राजकीय मंडळींनीही पाठिंबा दिला आहे. दारूबंदी अभियानअंतर्गत दारूबंदी कृती समितीच्या महिला कार्यकर्त्यांकडून गेल्या दोन महिन्यांपासून प्रबोधन केले जात आहे. सर्व गावातील महिलांचा मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून महिला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सुमारे दोन हजार पाचशे महिला मतदान यादीत समाविष्ट आहेत. सुमारे सत्तर टक्क्याहून अधिक महिला सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. भावी पिढीच्या दृष्टीने चांगला निर्णय असल्याने ऐतिहासिक, क्रांतिकारक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठीच महिला वर्गातून उत्साह बळावला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण गाव सामाजिक बांधिलकी जपत महिलांच्या लढ्याला पाठबळ देऊन कुमठेकर बाटली आडवी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.