शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मगरींच्या मुक्त वावरामुळे कृष्णाकाठावर धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:26 IST

सोमनाथ डवरी ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबे डिग्रज : गेल्या काही दिवसांत कृष्णा नदीत चार मगरी मृत झाल्याचे आढळून आले, तर गेल्या काही वर्षांत आतापर्यंत कृष्णा नदीतील मगरींनी सात व्यक्तींचे बळी घेतले आहेत. औदुंबर डोह ते सांगली पूल परिसरात मगरीचे दर्शन कायमचेच झाले आहे. वीसहून अधिकजण मगरींच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. एखादी ...

सोमनाथ डवरी ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबे डिग्रज : गेल्या काही दिवसांत कृष्णा नदीत चार मगरी मृत झाल्याचे आढळून आले, तर गेल्या काही वर्षांत आतापर्यंत कृष्णा नदीतील मगरींनी सात व्यक्तींचे बळी घेतले आहेत. औदुंबर डोह ते सांगली पूल परिसरात मगरीचे दर्शन कायमचेच झाले आहे. वीसहून अधिकजण मगरींच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. एखादी घटना घडली की वन विभाग जागा होतो. कागदी घोडे नाचविले जातात. प्राणीमित्रांचे ‘प्रबोधन’ सुरू होते.आतापर्यंत अनिकेत कदम (कसबे डिग्रज, २९ एप्रिल २००३), रामचंद्र नलवडे (भिलवडी, ११ नोव्हेंबर २००४), सुनील भोसले (अंकलखोप, १६ एप्रिल २००७), वसंत मोरे (भिलवडी, २९ मार्च २०१५), अजय जाधव (चोपडेवाडी, २० एप्रिल २०१५) आणि नुकताच संजय भानुसे (तुंग) या सातजणांचा मगरींच्या हल्ल्यात बळी गेला आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत अंकलखोप, ब्रह्मनाळ, कसबे डिग्रज, सांगली, तुंग या ठिकाणी नदीवर अंघोळीसाठी, मासेमारीसाठी, वैरणीसाठी गेलेल्या सुमारे ४० जणांवर मगरींनी जीवघेणे हल्ले केले आहेत. नदीवर विविध कारणांनी जावेच लागते. वाळू उपशामुळे मगरींची आश्रयस्थाने उद्ध्वस्त झाली आहेत. पण याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.औदुंबर डोह ते सांगली पूल परिसरात वन विभागाने ९ जून २०१५ रोजी केलेल्या मगर सर्वेक्षणात १९ मोठ्या आणि ३९ लहान मगरी आढळल्या. मगर एकावेळी ४०-५० पिलांना जन्म देते. यापैकी ४-५ जरी प्रौढ झाल्या, तरी मगरींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.२५ नोव्हेंबरला तुंग येथे एक मगर मृत आढळली, तर इनाम धामणी येथे दोन चार-पाच फुटी मगरींची हत्या झाल्याचे आढळले. तसेच २५ डिसेंबर रोजी कसबे डिग्रज बंधारा जॅकवेलजवळ दहाफुटी मगरीची हत्या केलेले शीर आढळले. मात्र तिचे बाकीचे धड सापडले नाही. हे प्रकरण प्रसारित होऊ नये, यासाठी वन विभाग प्रयत्न करताना दिसून येत आहे. सध्या या प्रकरणाचा शोध सुरू आहे. पोलिसात प्रकरण दाखल आहे, पण अद्याप याबाबत ठोस माहिती पुढे येत नाही.मगरींची शिकार, तस्करी होतेय का?सध्या मानवबळीनंतर आता मगरहत्यांची मालिका सुरू होत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. मगरींची शिकार किंवा तस्करी होते का? याबाबत शोध घेणे गरजेचे आहे. संशय कुणावर घ्यायचा, हा प्रश्न आहे. वनखाते कागदी घोडे नाचवित आहे. मगरतचे दर्शन, भीती कायमच आहे. मगरी पकडण्याबाबत ठोस धोरण गरजेचे आहे. गेली कित्येक वर्षे संरक्षक जाळी, नदीवर वीज व्यवस्था याबाबतची चर्चा वन विभाग करतो. महाजाळी कितपत योग्य ठरते, हे महत्त्वाचे आहे. प्राणीमित्रांच्या प्रबोधनाचा कितपत उपयोग होतो, हाही प्रश्न आहेच.