शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

जिल्ह्याचा कृष्णाकाठ ‘मगरमिठी’त...

By admin | Updated: April 23, 2015 00:41 IST

वीस दिवसांत दोघांचे बळी : वन कर्मचाऱ्यांची गस्त सुरू, नागरिकांतून वनविभागाबाबत संताप

सांगली : तीन महिन्यांपासून सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पात्रात महाकाय मगरींचा वावर वाढला असून, गेल्या वीस दिवसांत या मगरींनी दोघांचा बळी घेतला आहे. मगरींच्या वावराने कृष्णाकाठ भेदरला असून, संतप्त नागरिकांशी आता वन विभागाला तोंड द्यावे लागत आहे. या मगरींना पकडण्यासाठी नागपूरच्या मुख्य वनसंरक्षकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तोपर्यंत मगरींच्या वास्तव्याच्या ठिकाणी वन कर्मचाऱ्यांची गस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील औदुंबर, ब्रह्मनाळ, भिलवडी या कृष्णाकाठच्या गावांमध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून मगरींचे वास्तव्य आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या मगरी आक्रमक झाल्या असून, त्यांनी नागरिकांवर हल्ले सुरू केले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून सांगली शहरालगतच्या नदीपात्रातही मगरींचे दर्शन नियमित होत आहे.सोमवारी चोपडेवाडी (ता. पलूस) येथे नदीमध्ये अंघोळ करण्यासाठी गेलेला शाळकरी मुलगा अजय शहाजी यादव (वय १३) याला मगरीने ओढून नेले. मंगळवारी त्याचा मृतदेह सापडला. त्यापूर्वी भिलवडीजवळ २९ मार्चला जळगाव जिल्ह्यातील ऊसतोड मजूर वसंत मोरे (वय ३६) या मजुराचा मगरीच्या हल्ल्यात बळी गेला होता. त्यामुळे कृष्णाकाठावर भीतीचे वातावरण पसरले आहे. नदीमध्ये पोहणाऱ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात घटली आहे. शेतीला पाणी देण्यासाठी, मोटार सुरू करण्यासाठी नदीकाठी जाणाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. घाटावर, पाणवठ्यावर धुणे धुण्यासाठी जाणाऱ्या महिलांची संख्याही आता घटली आहे. पलूस तालुक्यातील व सांगली शहर परिसरात मगरींचे वास्तव्य असणारी दहा ठिकाणे आता वन विभागाने निश्चित केली आहेत. सांगलीतील जॅकवेल परिसर, औदुंबर, ब्राह्मनाळ, चोपडेवाडी, भिलवडीचा त्यात समावेश आहे. तेथे आता दिवसभरासाठी वन कर्मचारी गस्त घालणार आहेत. मगरीच्या हल्ल्यापासून बचाव करण्याचे नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नदीकाठावरील बेसुमार वाळू उपशामुळे मगरींचे वास्तव्य धोक्यात आले आहे, असेही आता सांगण्यात येत आहे. परिणामी त्या काठाकडे येत आहेत. त्यातच मगरींचा सध्या प्रजनन काळ असल्यामुळे हल्ले वाढले असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)मगरी पकडण्याचे आदेश आले?नागपूर येथील मुख्य वनसंरक्षकांनी कृष्णा नदीपात्रातील मगरींना पकडून त्यांना चांदोली जलाशयात सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसा आदेश सांगली जिल्ह्याच्या वन विभागाला प्राप्त झाला आहे, अशी माहिती नगरसेविका स्वरदा केळकर यांनी दिली. हा आदेश वनअधिकारी एस. एम. भोसले यांना मिळाला होता, पण त्यांची बदली झाल्याने हा आदेश पुन्हा बारगळला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मगरी पकडण्यासाठी परवानगी मागणारा प्रस्ताव सांगली जिल्हा वनअधिकाऱ्यांकडून पाठविण्यात आला आहे. तत्पूर्वी मगरींची संख्या मोजण्याचीही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. मगरी पकडण्यासाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही. यासाठी आम्ही नागपूर येथील प्रधान वनसंरक्षकांकडे परवानगी मागितली आहे. तोपर्यंत मगरींचे वास्तव्य असणाऱ्या दहा ठिकाणी वन कर्मचारी दिवसभर पहारा देणार आहेत. गावागावामध्ये जनजागृतीची मोहीमही आता सुरू करण्यात आली आहे. मगरींची गणना करण्यासाठी आम्ही परवानगी मागितली आहे.- समाधान चव्हाण, विभागीय वन अधिकारी, सांगली.