कामेरी येथे कृष्णेचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. यावेळी सी.बी. पाटील, संजय पाटील, लिंबाजी पाटील, सुनील पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कामेरी : कृष्णा कारखान्यात सत्ता आली तेव्हा कारखाना सुरू करणेही अवघड होते. मात्र सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच अडचणीतून मार्ग काढत बिकट परिस्थितीतून सहा वर्ष यशस्वीपणे कारखाना चालवला आहे. त्यामुळेच राज्यातील सहकारी कारखानदारीत कृष्णा कारखाना अग्रस्थानी आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष डॉ.सुरेश भोसले यांनी केले.
कामेरी (ता. वाळवा) येथे ऊस उत्पादक शेतकरी सभासद संपर्क बैठकीमध्ये ते बोलत होते. ज्येष्ठ नेते सी. बी पाटील, रणजित पाटील, सुनील पाटील, जयराज पाटील, शहाजी पाटील, डॉ. रणजित पाटील, कारखान्याचे संचालक लिंबाजीराव पाटील, संजय पाटील, जितेंद्र पाटील, अमोल गुरव, धोंडीराम जाधव, सुजित मोरे, मनोज पाटील यांच्यासह कामेरी गावातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कारखाना चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून काम करण्याची गरज आहे. कारखान्याची गाळप क्षमता नऊ हजार मेट्रिक टनापर्यंत वाढवली आहे. याचा फायदा शेतकरी सभासदांना होत आहे. येत्या काळातही गाळप क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन करत आहे. कारण गेली सहा वर्ष उच्चाकी दराची परंपरा आम्ही जोपासली आहे. त्यामुळेच कामेरी गावातले लोक निश्चितपणे चांगल्या विचारांच्या पाठीशी ठाम उभा राहतील व पूर्वीप्रमाणे आम्हाला साथ देतील, असा विश्वास यावेळी डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला.
यावेळी सी.बी. पाटील, संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस शेतकरी सभासदांची उपस्थित होते.