कृषिरत्न डॉ. संजीव माने यांचा सत्कार करताना अशोका अॅग्रोचे संस्थापक डॉ. सतीश पाटील, तंत्रअधिकारी बिभीषण पाटील, वारणा कारखाना संचालक उदय पाटील, व्ही. जे जाधव.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : कृषिरत्न डॉ. संजीव माने यांनी उसाचे एकरी उत्पादन वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसह आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात येथील शेतकऱ्यांना एकरी १०० टनांपासून २०० टन ऊस उत्पादन घेण्यास प्रवृत्त केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती केली आहे, असे प्रतिपादन अशोका अॅग्रोचे संस्थापक डॉ. सतीश पाटील यांनी केले.
पोखर्णी (ता. वाळवा) येथील अशोका अॅग्रोच्या वतीने डॉ. संजीव माने यांना कृषिरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कारप्रसंगी सतीश पाटील बोलत होते. यावेळी वारणा सहकारी साखर कारखाना संचालक उदय पाटील, तंत्रअधिकारी बिभीषण पाटील, शिवाजी हायस्कूलचे माजी प्राचार्य व्ही. जे. जाधव, अजिंक्य माने उपस्थित होते.