शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

क्रांतिसूर्याला सांगलीकरांची भीमवंदना

By admin | Updated: April 14, 2017 23:34 IST

सांगलीत विविध उपक्रम : बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी; शहरात मिरवणुका

सांगली : ‘बाबासाहेब हमारी जान है... भारत की शान है... एकच साहेब, बाबासाहेब...’ अशा घोषणांसह ‘जय भीम’चा नारा देत ढोल-ताशा, बँजोपथकाच्या गजरात निघालेल्या उत्स्फूर्त मिरवणुका... त्यात सहभागी झालेले नागरिक... अशा उत्साही वातावरणात शुक्रवारी सांगलीकरांनी क्रांतिसूर्याला भीमवंदना दिली. सांगली शहर व परिसरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच उत्साही वातावरणात आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम आणि त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, अशा वातावरणात जयंतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. गेल्या दोन दिवसांपासून विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार असलेल्या फलकांमुळे शहरातील वातावरण आंबेडकरमय झाले होते. गुरुवारी सायंकाळपासूनच शहरातील अनेक उपनगरांत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रात्री बारापासून मुख्य बसस्थानकाजवळील शास्त्री चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करण्यासाठी गर्दी झाली होती. रात्री बारा वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पुतळा परिसर विजेच्या माळांच्या रोषणाईने उजळून निघाला होता. पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार नितीन शिंदे, माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे, प्रकाश बिरजे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सदाशिव खाडे, माजी नगरसेवक मुन्ना कुरणे, दक्षता समितीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुरेश दुधगावकर, दलितमित्र अशोक पवार, डॉ. प्रताप मधाळे, सुधाकर कांबळे, मधुकर पद्माळकर आदी उपस्थित होेते. यावेळी सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच ध्वजवंदन करण्यात आले. चेतन कांबळे यांच्या ‘कथा एका महामानवाची’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.शुक्रवारी दिवसभरात माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, महापौर हारुण शिकलगार, शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जयश्रीताई पाटील, विविध राजकीय पक्ष, संघटनांचे नेते व कार्यकर्त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळातर्फे सायंकाळी सात वाजता आंबेडकरांच्या पुतळ्यापासून मिरवणूक काढण्यात आली. सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीत आंबेडकरांचा पुतळा ठेवण्यात आला होता. पारंपरिक वाद्ये व बँजोच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत महिला व लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. महोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुरेश दुधगावकर, अर्जुन कांबळे, माजी आमदार नितीन शिंदे, राजा ढाले, प्रमोद कुदळे, नितीन गोंधळी, सचिव सव्वाखंडे, रमेश वाघमारे हेही सहभागी होते. शिवाजी मंडई, मारुती चौक, बालाजी चौक, राजवाडा चौक आदी मार्गावरुन ही मिरवणूक गेली. आंबेडकरनगर येथूनही बँजोच्या निनादात मिरवणूक शहरातून काढण्यात आली. मृत्युंजय ग्रंथालययशवंतनगर येथे मृत्युंजय ग्रंथालय व मृत्युंजय क्रीडा व्यायाम मंडळामध्ये संस्थेचे अध्यक्ष विजय पवार यांच्याहस्ते आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. प्रकाश पवार, ग्रंथपाल विशाखा पवार, वैशाली पवार, तुषार माने, बी. के. कुलकर्णी, रवींद्र कुलकर्णी, सुनील शिंदे, उदय महाले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा सेवा संघसांगली : मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवनामध्ये कार्याध्यक्ष विजय भोसले, संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन चव्हाण, सर्जेराव पाटील यांच्याहस्ते आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. शाहीर पाटील, बजरंग यादव, प्रा. सुभाष सावंत, तात्याराव कोटलगी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पाचशे झाडांचा संकल्पगावभागातील सिद्धार्थ व्यायाम मंडळातर्फे आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्ष कुशल कांबळे व नगरसेवक बाळासाहेब गोंधळी यांच्याहस्ते आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष विजय गोंधळी, संजय इंजे, रोहित शिवशरण, अभिजित रांजणे, भारत कुदळे, प्रियम जयकर उपस्थित होते. मंडळातर्फे पाचशे झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला. त्याची सुरुवातही केली आहे. पाणपोईचीही सोय केली आहे. सायंकाळी पारंपरिक वाद्यांच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली.छायाचित्रांचे प्रदर्शनसांगली जिल्हा प्रोफेशनल फोटो व व्हिडिओ असोसिएशन व दि बुध्दिस्ट इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने पंचमुखी मारुती रस्त्यावरील यशवंत हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कामगार नेते बापूसाहेब मगदूम यांच्याहस्ते याचे उद्घाटन झाले. अध्यक्ष हर्षद खाडे, बी. आर. पाटील, गोविंद आयेकर, प्रदीप लठ्ठे, प्रदीप सुतार, विश्वास मागाडे, सुरेंद्र दुपटे, अमर सम्राट, विनायक जाधव, संजय सारडा, कृष्ण चरणकर, महेश तावरे, प्रमिला मागाडे, सागर गडदे, विश्वास माने आदी उपस्थित होते.