लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या विशेष निधीतून नागाव (ता. वाळवा) येथे आरोग्य उपकेंद्रासाठी संरक्षक भिंत बांधण्यात आली. तिचे लोकार्पण मंगळवारी कोरे यांच्याहस्ते झाले. आरोग्य व शिक्षण सभापती आशा पाटील, राहुल महाडिक यावेळी उपस्थित होते.
कोरे यांच्याहस्ते कोविडयोद्धे डॉ. महेश पाटील, सीमा भिलावे, सुनील गोंदकर, राजश्री कांबळे, पुष्पा टिबे, भारती पाटील, जितश्री कांबळे, आनंदीबाई जाधव यांचा सत्कार झाला. आशा पाटील यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. महाडिक यांनीही कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ग्रामपंचायतीने कोविड काळात केलेल्या कामाची दखल घेऊन ग्रामसेविका शुभांगी भारती यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. राजेंद्र पाटील, चेतन मगर, आप्पासाहेब पाटील, उपसरपंच संभाजी भोळे, विनोद पाटील, अनिल पाटील, चंद्रकांत मगर, श्रीकांत मगर आदी उपस्थित होते.