शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

कोंतेवबोबलाद, कागनरीत जुगारावर छापे

By admin | Updated: April 17, 2017 23:27 IST

विशेष पथकाची कारवाई : आलिशान वाहनांसह पन्नास लाखांचा मुद्देमाल जप्त

उमदी : उमदी (ता. जत) येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या कोंतेवबोबलाद, कागनरी येथील सीमेवरील जुगार अड्ड्यांवर सांगलीच्या विशेष पोलिस पथकाने छापा टाकून पन्नास लाखांच्या मुद्देमालासह २६ आरोपींना ताब्यात घेतल्याची घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. उमदी परिसरातील सर्वात मोठी कारवाई आहे. विशेष पथकाच्या या कारवाईने उमदी पोलिसांचे पितळ पूर्णपणे उघडे पडले आहे. उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोंतेवबोबलाद व कागनरी हद्दीमध्ये अनेक महिन्यांपासून जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सांगलीच्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर रविवारी रात्री दहाच्या सुमारास सापळा रचण्यात आला. कोंतेवबोबलाद व हिंचगेरी येथील दोन्ही जुगार अड्ड्यांवर छापा टाकून पन्नास लाखांचा मुद्देमाल जप्त करून २६ जणांना ताब्यात घेतले. त्यांना उमदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या छाप्यात कोंतेवबोबलाद येथे तुकाराम गंगाप्पा साळी, परसाप्पा साबुहवी, प्रकाश चन्नाप्पा अगसर, रमेश बसाप्पा नुची, विशाल रवींद्र शेरखाने, श्रावण छत्रीबा सरगर, बसाप्पा महादेव तेली, बबन रामा करे, शिवाजी गरिबा भिसे, जटिंग महिबून पांडू, लक्ष्मण सिध्दाप्पा बालेकर, सलीम मौलाना जागीरदार, उमेश दशरथ व्हसमनी या तेरा जणांना पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील मुद्देमाल, दोन चारचाकी वाहने (क्र. केए २८ सी ३३३२ व केए ५३ सी ६०१२), पाच दुचाकी (क्र. केए २८ ईए ९१००, केए २८ ईएल ७७९६, केए २८ आर २४६५, केए २८ ईजे ८३२४, केए २८ एक्स ८९२८), मोबाईल व रोख रक्कम असा एकूण २४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.कागनरी येथेही पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तेथे १३ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये रामण्णा हनुमान दोरजळे, चितांबर सुरेश देशपांडे, अशोक शिवाप्पा जैनापुरे, सिध्दनगोंडा तोटाप्पागोंडा बिरादार, विजयकुमार धोंडाप्पा साळुंखे, इराप्पा रूदाप्पा माडगी, समीर निसारअहमद मणियार, गंगाप्पा तिमाप्पा मटुर, गोकाराप्पा सदाशिव गानिगेर, परशुराम गणपती सालगल, जब्बार हनुसाब देगनाळ, संगमेश निलाप्पा नाशी, राम तिमण्णा गोलार यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून जुगार अड्ड्याच्या ठिकाणी मिळालेले साहित्य, दोन मोटारी, असा एकूण २६ लाख ४८ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलिस प्रमुखांच्या विशेष पथकाची ही सर्वात मोठी कारवाई आहे. यामुळे उमदी पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे. कोंतेवबोबलाद चेक पोस्टपासून हाकेच्या अंतरावर इतका मोठा जुगार अड्डा चालू असताना उमदी पोलिसांना याची कल्पना नव्हती का, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. (वार्ताहर)