शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर स्थानकात कोल्हापुरी चप्पल, साताऱ्यात कंदी  पेढा, मिरजेत तंतुवाद्याचे स्टॉल

By संतोष भिसे | Updated: May 15, 2023 23:14 IST

‘वोकल फॉर लोकल' मोहिमेअंतर्गत उपक्रम

संतोष भिसे, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: ‘वोकल फॉर लोकल' मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध रेल्वे स्थानकांवर स्थानिक उत्पादनांसाठी विक्रीकेंद्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. कोल्हापूर स्थानकात कोल्हापुरी चप्पल विक्रीसाठी परवानगी देण्यात आली असून मिरजेत प्रवाशांना तंतुवाद्ये खरेदी करता येणार आहेत.  साताऱ्यात कंदी पेढे विकले जात आहेत. हातकणंगले स्थानकात बांबूपासून तयार केलेल्या कलाकृती उपलब्ध झाल्या आहेत.

स्थानिक तथा स्वदेशी उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेने विविध स्थानकांंमध्ये 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट' (ओएसओपी) योजना सुरू केली आहे. स्थानिक उत्पादकांनी उत्पादीत केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करुन दिले आहेत. २५ मार्च २०२२ ते १५ मे २०२३ या कालावधीत महाराष्ट्रातील ६९ स्थानकांवर ७२ विक्री केंद्रे सुरु झाली आहेत. या सर्व केंद्रांची रचना एकसारखी आहे.स्थानिक आदिवासींनी बनवलेल्या कलाकृती, विणकरांची हातमाग वस्त्रे, लाकडावरील कोरीवकाम, चिकनकारी, जरीकाम, जर्दोशी यासारखी कलाकुसर, मसाले, चहा, कॉफी यासह विविध खाद्यपदार्थ या केंद्रात मिळतात. महाराष्ट्रातील स्थानकांत केळी, द्राक्षे, पापड, अहमदनगर येथे लोणचे, बडनेरा येथे सांबरवाडी, मुंबईत येथे चामड्याची उत्पादने, अगरबत्ती, धूप, साबण, चिंचवड येथे फिनाइल, चर्चगेट येथे चामड्याची उत्पादने यांची विक्री सुरु आहे.  गोरेगावमध्ये खादी उत्पादने, इगतपुरीत पपई, द्राक्षे, सफरचंद, लोणची, पापड इत्यादी हंगामी फळे व खाद्यपदार्थ, कोल्हापूरात कोल्हापुरी चप्पल, कणकवली व कुडाळ येथे लाकडी खेळणी, लोणावळा येथे चिक्की, नाशिकरोड येथे पैठणी साड्या , पंढरपूर येथे विठ्ठल मूर्ती, कुंकू, अगरबत्ती आणि इतर पूजा साहित्य, नागपूर येथे बांबू उत्पादने, परळ येथे कापड आणि हातमागावरील उत्पादने, पिंपरी येथे कागदी व कापडी पिशव्या, सातारा येथे कंदी पेढा, शेगावमध्ये पापड, सोलापुरात सोलापुरी बेडशीट्स आणि  टॉवेल, वापी आणि बोरिवली येथे वारली कला आणि हस्तकला, वसई रोड आणि नालासोपारा येथे खेळणी विकण्याची सुविधा देण्यात आली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर