शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
3
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
4
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
5
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
6
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
7
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
8
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
9
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
10
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
11
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
12
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
13
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
14
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
15
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
16
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
17
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
18
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
19
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
20
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 

शालेय बेसबॉल स्पर्धेत मुलांमध्ये कोल्हापूर, तर मुलींमध्ये लातूर विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:24 PM

अत्यंत चुरशीने झालेल्या राज्यस्तरीय शालेय सतरा वर्षाखालील बेसबॉल स्पर्धेत मुलांमध्ये कोल्हापूर विभागाने, तर मुलींत लातूर विभागाने विजेतेपद पटकावले. सांगलीतील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर हे सामने पार पडले.

ठळक मुद्देराज्य शालेय बेसबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरणसांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून स्पर्धेचे आयोजन

हरिपूर, सांगली , दि. २६ :  अत्यंत चुरशीने झालेल्या राज्यस्तरीय शालेय सतरा वर्षाखालील बेसबॉल स्पर्धेत मुलांमध्ये कोल्हापूर विभागाने, तर मुलींत लातूर विभागाने विजेतेपद पटकावले. सांगलीतील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर हे सामने पार पडले.

मुलांच्या अंतिम सामन्यात अनुभवी कोल्हापूर विभागाने नाशिकचा, तर मुलींच्या अंतिम सामन्यात लातूर विभागाने कोल्हापूर विभागाचा धुव्वा उडवत विजेतेपद आपल्या नावे केले. दरवर्षी अग्रेसर असलेल्या मुंबई व पुणे विभागाला मात्र यंदाच्यावर्षी तिसऱ्या  स्थानावर समाधान मानावे लागले आहे.

स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र क्रेडाईचे सहसचिव दीपक सूर्यवंशी, जितेंद्र सोनवणे व देवीदास राजपूत (मुंबई) यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले होते. प्रशांत पवार यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर जमादार यांनी आभार मानले.

यावेळी महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सरचिटणीस राजेंद्र इखणकर, सहसचिव प्रदीप खिलारे, खजिनदार अशोक सरोदे, समन्वयक ज्ञानेश काळे, शंकर भास्करे, उदय गायकवाड आदी उपस्थित होते. सांगलीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. विजेत्या संघाची दुर्ग (छत्तीसगड) येथे होणाऱ्या  राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.अंतिम निकाल...

मुले : कोल्हापूर (प्रथम), नाशिक (द्वितीय), मुंबई (तृतीय), पुणे (चतुर्थ).मुली : लातूर (प्रथम), कोल्हापूर (द्वितीय), पुणे (तृतीय), नाशिक (चतुर्थ).

टॅग्स :Sportsक्रीडाSangliसांगली