शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

मागणीअभावी कोकम थंडगार !

By admin | Updated: May 26, 2015 00:57 IST

शेतकरी मेटाकुटीला : खर्च व मिळकतीचे गणित जमत नसल्याने नाराजी; महत्त्वाचे पीक असले तरी अल्प दर

बाळकृष्ण सातार्डेकर - रेडी -रेडी परिसरात उन्हाळी हंगामाचा शेवट करणाऱ्या कोकम अर्थात रतांबा पिकाला मोठ्या प्रमाणात बहर आला आहे. गावागावांत, घरोघरी लोक कोकमापासून आमसुले (सोले) बनविण्याच्या कामात व्यग्र आहेत. असे असले, तरी कठोर परिश्रम घेऊन तयार करण्यात आलेल्या आमसुले पिकाला बाजारपेठ अथवा हवा तसा बाजारभाव मिळत नाही. आमसुले तयार करताना त्यासाठीची मेहनत, मनुष्यबळ व होणारा खर्च पाहता मिळणाऱ्या दरात खूप तफावत असते. त्यामुळे कोकम तयार करण्यासाठी शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. उन्हाळी हंंगामात काजू, आंबा व कोकम ही तीन महत्त्वाची पिके कोकणातील विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावात्ांील शेतकरी घेतात. या दिवसात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत आंबा, काजूगर अथवा सरबत देऊन केले जाते. परंतु आंंबा व काजू या दोन पिकांच्या तुलनेत कोकमला म्हणाव्या त्या प्रमाणात बाजारपेठ अथवा प्रसिध्दी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या फळापासून तयार करण्यात आलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ अथवा योग्य दर मिळत नाही, ही येथील शेतकरी, बागायतदारांची शोकांतिका आहे. आंबा, काजूनंतर कोकमचा हंगाम सुरू होतो. सध्या रेडी, शिरोडा, आरोंदा, आजगाव, धाकोरे, मळेवाड, आसोली, वडखोल, सोन्सूरे या गावांमध्ये कोकम गोळा करून त्यापासून विविध उत्पादने घेण्यासाठी शेतकरी बागायतदार वर्ग रात्रंदिवस झटत आहे. कोकमपासून आमसुले (आगळी सोले), कोकमच्या बियांपासून मुटला, कोकम सरबत अशा प्रकारची घरगुती उत्पादने घेतली जातात. परंतु इतर फळांच्या बाबतीत हे सर्व करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रंदिवस कष्ट करावे लागतात. अशी आहे पद्धतकोकम तयार करताना सर्वप्रथम झाडावर तयार झालेला रतांबा काढावा लागतो. त्यानंतर गोळा करून तो घरी आणला जातो. घरातील माणसे किंवा मजूर घालून त्या फळांचा रस, बिया व पाकळ्या वेगवेगळी केली जातात. आमसुले बनविताना अपार कष्ट करावे लागतात. कारण रतांब्याची पाकळी वेगळी केल्यानंतर त्या पाकळ्या चार वेळा आगळ या रसामध्ये भिजवून कडक उन्हात सुकवाव्या लागतात. या प्रक्रि येसाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो.प्रत्यक्षात आमसुले तयार करताना शेतकऱ्यांचे नाकीनऊ येतात. मात्र, तयार झालेल्या आमसुलांना मिळणारा दर फार अल्प असतो. ही सर्व मेहनत करून ती तयार करण्यापेक्षा बाजारात नेऊन विकण्यास परवडतात. उत्पादने व मागणीआमसुले (आगळी सोला) - सर्वसामान्य घर ते पंचतारांकित हॉटेलमध्ये कोकम कडी, सोलकडी, मच्छिकडीला (आमटी) उत्कृष्ट चव येण्यासाठी कढी उकळताना आतमध्ये टाकल्या जातात. तसेच माणसाच्या अंगावर पितांब आली असेल, तर आमसुले पाण्यात भिजवून लावतात व कोकम रस प्यायला दिला जातो. कोकम रस (आगळ), थंड कोकम सरबत, उत्कृष्ट चवदार ज्यूस, जेवल्यानंतर पचनासाठी उत्कृष्ट सोलकढी या पदार्थांमध्ये कोकमचा वापर केला जातो. मुटले (रतांबा लोणी) - कोकमाच्या बियापासून उत्कृष्ट मुटले तयार केले जाते. त्याचा आहारात चपाती-भाकरीवर कडवूल तेल म्हणून वापर केला जातो. थंडीच्या दिवसात माणसाच्या पायांना भेगा पडल्यास मुटले कडवून घासून लावले जाते. त्यामुळे भेगामधील दाह शांत होऊन भेगा बऱ्या होतात. अशाप्रकारे कोकणातील परंपरागत कोकम व्यवसाय करणारा शेतकरी व्यवसाय करून थोड्या प्रमाणात का होईना, उदरनिर्वाह करतात. सध्या बाजारपेठेत कोकम आमसुले १५० ते १६० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहेत. तसेच कोकम मुटले २० रुपये प्रति नग आणि कोकम बिया (जुन्या) सुमारे ५० ते ६० रुपये दराने विकली जातात. सध्या बाजारात आमसुले १५० ते १६० रुपये प्रतिकिलो दराने विकली जातात. परंतु प्रत्यक्षात हा दर खूपच कमी असून, जास्त दर मिळणे आवश्यक आहे. जेणेकरून होणारा खर्च तरी वसूल होईल, अशी उत्पादन करणाऱ्या शेतकरी-बागायतदारांची मागणी आहे. कोकमची प्रसिध्दी व्हावी कोकमपासून विविध उत्पादने बनविण्याच्या कोकणातील या परंपरागत व्यवसायाचा पूर्ण अभ्यास करून त्यासाठी शासनाने एक समिती बनविणे आवश्यक आहे. या समितीद्वारे कोकम उत्पादनांची माहिती देश-विदेशात प्रसारित करून शासनाने कोकम उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळवून देण्यास प्रयत्न केले पाहिजेत. असे झाल्यास हा व्यवसाय करणारा शेतकरी, बागायतदार आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. - प्रसाद रेडकरबागायतदार, रेडी-म्हारतळेवाडीबागायतदारांची समस्याकोकणातील परंपरागत आमसुले तयार करताना झाडावर चढण्यासाठी व कोकम फोडण्यासाठी जास्त मोबदला देऊनही मजूरवर्ग वेळेत मिळत नाही, ही येथील शेतकरी-बागायतदारांची मोठी समस्या आहे. त्यामुळे पाऊस पडल्यावर काढलेली कोकम खराब होतात. शासनस्तरावर पडीक जमिनीत कोकम लागवडीसाठी शेतकऱ्यांना विविध कार्यक्रमातून प्रोत्साहनपर भाषणे दिली जातात. विविध योजना राबवून लोकांना कोकम लागवडीसाठी आकर्षित केले जाते. प्रत्यक्षात मात्र जे लोक हा व्यवसाय परंपरागत करीत आहेत, त्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. याबाबत शेतकरी बागायतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे.