इस्लामपूर : महान हिंदी पार्श्वगायक किशोरकुमार यांचे चिरंजीव, प्लेबॅक सिंगर अॅवॉर्ड विजेते अमितकुमार यांनी ‘बडे अच्छे लगते हो.., याद आ रही है़, ये जमीं गा रही है़.़ ’ आदी सुपरहिट गाण्यांबरोबरच किशोरदांची ‘कोरा कागज़.़ ओ माझी रे़.़ चिंगारी कोई भडके़.़ पल पल दिल के पास़.़ नदीसे दर्या़.़ ये दिल ना होता बेचारा़.़ ’ यासारखी असंख्य अजरामर गाणी सादर करून इस्लामपूरकर रसिकांचा गुढीपाडवा अविस्मरणीय केला़.आविष्कार कल्चरल ग्रूपने इस्लामपूर नगरपालिकेच्या खुल्या नाट्यगृहात ‘किशोर की यादे बाय अमितकुमार अँड सुमितकुमार’ या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते़ यावेळी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते अमितकुमार आणि सुमितकुमार यांचा गौरव करण्यात आला.अमितकुमार यांनी प्रथम स्वत:ची गाणी सादर केल्यानंतर, पार्श्वगायिका शैलजा सुब्रह्मण्यम यांच्यासमवेत अनेक चित्रपटांतील गाजलेली हिंदी गाणी गायिली. किशोरदांचा हुबेहूब आवाज आणि त्यांच्याच लकबीने ही गाणी सादर करून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. दोन्ही भावांनी ‘बाबू समझो इशारे, मै हू झुमरू’ या किशोरदांच्या गाण्यांनी समोराप केला़. युवा गायक वैभव आशिषनेही गाणी सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. दिलीपतात्या पाटील यांच्याहस्ते, प्रांताधिकारी विजयसिंह देशमुख, आळंदीचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.‘आविष्कार’चे सदस्य विश्वास पाटसुते यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. सदानंद गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)
किशोरदांच्या जागल्या आठवणी!
By admin | Updated: March 23, 2015 00:44 IST