शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

खरसुंडीत सासनकाठी सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:48 IST

देशभरात प्रसिद्ध असलेल्या खरसुंडी (ता.आटपाडी) येथील सिद्धनाथाच्या चैत्र यात्रेतील सासनकाठी सोहळा बुधवारी उत्साहात पार पडला. लाखो भाविकांच्या उपस्थितीत गुलाल-खोबऱ्याची उधळण आणि नाथबाबाच्या नावानं चांगभलंऽऽच्या जयघोषाने नाथनगरी दुमदुमून गेली होती.

ठळक मुद्देखरसुंडीत सासनकाठी सोहळा उत्साहातगुलाल-खोबऱ्याची उधळण आणि नाथबाबाच्या नावानं चांगभलंऽऽचा जयघोष

खरसुंडी : देशभरात प्रसिद्ध असलेल्या खरसुंडी (ता.आटपाडी) येथील सिद्धनाथाच्या चैत्र यात्रेतील सासनकाठी सोहळा बुधवारी उत्साहात पार पडला. लाखो भाविकांच्या उपस्थितीत गुलाल-खोबऱ्याची उधळण आणि नाथबाबाच्या नावानं चांगभलंऽऽच्या जयघोषाने नाथनगरी दुमदुमून गेली होती.सिद्धनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी आदल्यादिवशी रात्री बारापासूनच रांगा लावल्या होत्या. गावातील सर्व रस्त्यांवरून मानाच्या सासनकाठ्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भक्तिमय वातावरणात नैवेद्यासह मंदिराकडे येत होत्या.

चौकाचौकात नाथबाबाच्या नावानं चांगभलंऽऽचा जयघोष करीत भाविक खरसुंडीत दाखल होत होते. कुलदैवत सिद्धनाथाच्या पालखी, सासनकाठीवर गुलाल-खोबऱ्याची उधळण करून नवस फेडण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. अनेक भाविकांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.बुधवारी दुपारी दोन वाजता आटपाडीचे प्रमुख मानकरी राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याहस्ते मानपान आणि विधिवत पूजा करून इतर मानकरी, सेवेकरी, ग्रामस्थ, भाविकांच्या उपस्थितीत सिद्धनाथाच्या पालखीचे जोगेश्वरी मंदिराकडे प्रस्थान झाले. यावेळी मानाच्या सासनकाठ्या पालखीबरोबर निघाल्या.

भालदार-चोपदार, छत्र-चामर, सेवेकरी, मानकरी असा सिद्धनाथाचा शाही लवाजमा मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडताच सभोवताली जमलेल्या हजारो भाविकांनी नाथबाबाच्या नावानं चांगभलंऽऽचा जयघोष करीत गुलाल-खोबऱ्यांची उधळण केली.

मुख्य बाजारपेठेतून सिद्धनाथाची पालखी गुलाल-खोबऱ्याची उधळण झेलत जोगेश्वरी मंदिराकडे निघाली. मंदिराच्या प्रमुख पटांगणामध्ये मानवंदना देण्यात आली. पालखी जोगेश्वरी मंदिरात दाखल होऊन मानपान व धुपारती करून पुन्हा सिद्धनाथ मंदिराकडे गेली.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेSangliसांगली