शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

खिरवडे, हत्तेगावचे पंप १ डिसेंबरपासून सुरू होणार

By admin | Updated: November 16, 2015 23:58 IST

शिवाजीराव नाईक : ‘वाकुर्डे’च्या आढावा बैठकीत थकबाकीदारांचा वीज पुरवठा बंद करण्याचे आदेश

कोकरूड : वाकुर्डे बुद्रुक योजनेचे खिरवडे, हत्तेगाव येथील पंप १ डिसेंबर रोजी सुरू होतील. २०१३-२०१४ च्या हंगामात काही बड्या शेतकऱ्यांनी ‘वाकुर्डे’चे पाणी घेऊन वीज वितरण कंपनीची बिले जाणूनबुजून थकवली आहेत. त्यांच्या विद्युत पंपाची वीज कनेक्शन्स ताबडतोब तोडावीत, असे आदेश आमदार शिवाजीराव नाईक यांनी दिले. शिराळा तहसील कार्यालयात आयोजित वाकुर्डे योजना आढावा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे होते. यावेळी शिराळाचे तहसीलदार विजय पाटील, इस्लामपूरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता टी. टी. सूर्यवंशी, जे. जे. बारदेसकर, शिराळाचे गटविकास अधिकारी, इस्लामपूरचे गटविकास अधिकारी विजय पाटील, जि. प. सदस्य रणधीर नाईक, सुखदेव पाटील, अरविंद बुद्रक, विजय कांबळे, विजय पाटील प्रमुख उपस्थित होते. नाईक म्हणाले, चांदोली धरणात यावर्षी ९३ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या पाणी साठ्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी या आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. वारणा धरणातून डिसेंबर महिन्याच्या १ ते ७ तारखेला पाणी आवर्तन सुरू होणार आहे. चालूवर्षी चांदोली धरणातून एकूण पाच आवर्तनांद्वारे एकूण ३५ दिवस पाणी सोडण्यात येणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी वीज वितरणची वीज बिले देखील थकवली आहेत. त्यावेळच्या २३ लाख थकबाकीपैकी अद्याप १३ लाख बाकी असल्याने वाकुर्डे बुद्रुक योजना अशा शेतकऱ्यांमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. जे शेतकरी जुनी थकबाकी भरणार नाहीत, त्यांच्या वीज मोटारींचे कनेक्शन ताबडतोब तोडावे. नाईक म्हणाले, कऱ्हाड तालुक्याने देखील ‘वाकुर्डे’चे पाणी मांड नदीत सोडावे. घोगाव, उंडाळे तलाव त्यामधून भरून द्यावेत, अशी मागणी केली आहे. पाटबंधारे विभागाने ७ दिवसांचा आवर्तनाचा कालावधी वाढवून तो किमान १० दिवस तसे केल्यास वाकुर्डेचा करमजाई तलाव भरेल. करमजाई भरल्यावर पहिल्या टप्प्यात कऱ्हाड तालुक्यालादेखील पाणी मिळेल. याकरिता २० एम.सी.एफ.टी. पाण्याची आवश्यकता आहे. यावेळी अरविंद पाटील, विजय कांबळे, विजय पाटील, सुनील पाटील, नामदेव पाटील यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)‘वीज वितरण’चे अधिकारी धारेवर खिरवडे व हत्तेगाव पंप हाऊसच्या दुरूस्तीसाठी त्याठिकाणी सिंगल फेज कनेक्शन वीज वितरण कंपनीने तातडीने द्यावीत, या विषयावरून आमदार नाईक वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. काहीही करा, कायदा व व्यवहार, लोकांची तातडीची गरज पाहून याठिकाणी ताबडतोब सिंगल फेज वीज कनेक्शन द्या, तुमच्यामुळे वाकुर्डे बुद्रुक योजनेत पाणी सोडण्यास विलंब झाल्यास आपल्याला जबाबदार धरण्यात येईल. जर याबाबत कार्यवाही झाली नाही, तर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत संबंधित सर्व विभागांची बैठक बोलावण्यात येईल, असा इशारा नाईक यांनी दिला.