शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

खाऊची पाने यंदा होणार महाग, थंडी जोमात आणि पानवेली कोमात

By श्रीनिवास नागे | Updated: November 9, 2022 17:52 IST

पदरमोड करून तयार केलेले पानमळे परतीच्या पावसाने व थंडीने डोळ्यादेखत नामशेष होत आहेत.

सांगली : अतिरिक्त पाऊस व थंडीमुळे मिरज पूर्व भागातील पानमळ्यातील पानवेलींच्या मुळांची वाढ खुंटत असल्याने पानवेली सुकू लागल्या आहेत. थंडी जोमात आणि पानवेली कोमात अशी पान उत्पादकांची स्थिती झाली आहे. उत्पादन घटल्याने खाऊची पाने यंदा महाग होणार असल्याचा अंदाज आहे.मिरज पूर्व भागातील पानमळ्यांची संख्या जास्त आहे. यंदा परतीच्या पावसाने सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये पानमळ्यांमध्ये पाणी जास्त होऊन जागेवरच मुरण्याची प्रक्रिया झाली. याचे परिणाम आता जाणवायला सुरुवात झाली आहे. पावसाने पानवेलीची मुळे कुजून पानवेली सुकू लागल्या आहेत. पान उत्पादकांनी मुळकूजव्या रोगाच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करुनही हाती निराशाच आली आहे. मुळकूज रोगाने पानवेलींची पाने गळून पडत आहेत. त्यानंतर पानवेल हळूहळू सुकून जाते. एकदा हा रोग पानमळ्यात घुसला की पानमळ्यातील सर्व पानवेली आठ दिवसांत नामशेष होतात.एक गुंठा पानमळा तयार करण्यासाठी किमान पाच ते सात हजार रुपये खर्च येतो. दहा गुंठे पानमळा लागणीसाठी किमान ५० ते ७० हजार रुपये खर्च येतो. पानवेली लागणीनंतर दुसऱ्या वर्षापासून पाने खुडणीस येतात. पान खुडणीसाठी कुशल कामगारच लागतात. याही कामगारांना आगाऊ पैसे दिले तरच ते कामावर येतात. इतकी पदरमोड करून तयार केलेले पानमळे परतीच्या पावसाने व थंडीने डोळ्यादेखत नामशेष होत आहेत. यामुळे पान उत्पादकांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे. उत्पादन घटल्याने खाऊची पाने यंदा महागणार असल्याचा अंदाज आहे.ठिबकने पाणी द्यायाबाबत मिरज कृषी विभागाचे कृषी सहायक राजू रजपूत म्हणाले की, पानमळ्याला पावसाळ्यात पाणी वाफ्याने देऊ नये. शक्यतो ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्याची व्यवस्था करावी. परतीच्या पावसाने वाफ्यात साचलेले पाणी त्वरित बाहेर काढून सोडल्यास पानवेलीवर या रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो.भरपाईची मागणीपानउत्पादक रावसाहेब चौगुले (नरवाड, ता. मिरज ) यांचे ६० गुंठे क्षेत्राचे मूळकुज रोगाने नुकसान झाले आहे. त्यांनी नुकसान झालेल्या सर्व पानमळ्याचे शासनाने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Sangliसांगली