शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
3
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
4
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
5
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
6
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
7
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
8
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
9
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
10
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
11
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
12
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
13
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
14
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
15
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
16
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
17
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
18
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
19
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

झुक झुक गाडीत वसली खटावची जिल्हा परिषदेची वस्ती शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:19 AM

धुरांच्या रेषा करत झुक झुक धावणारी रेल्वे म्हणजे बच्चे कंपनीची आवडती सफारी. याच रेल्वेत बसून आनंदी वातावरणात शिक्षण घेता आले तर? प्रश्न पडला ना? पण मिरज तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या व कर्नाटक सीमेवरील

ठळक मुद्देइमारतीला रेल्वेचे रूप : व्हनानावर वस्तीवरील शैक्षणिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक माझी शाळा अभियानाअंतर्गत लोकसहभागातून धावतेय शैक्षणिक एक्सप्रेस

सांगली : धुरांच्या रेषा करत झुक झुक धावणारी रेल्वे म्हणजे बच्चे कंपनीची आवडती सफारी. याच रेल्वेत बसून आनंदी वातावरणात शिक्षण घेता आले तर? प्रश्न पडला ना? पण मिरज तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या व कर्नाटक सीमेवरील खटावमधील व्हनानावर वस्ती शाळेने हे स्वप्न सत्यात उतरविले आहे. शाळेतील उपक्रमशील शिक्षकांनी कलात्मकतेला वाव देत शाळेच्या इमारतीला रेल्वे डब्याचे आकर्षक रूप दिले आहे. गावकऱ्यांच्या मदतीने या शाळेची एक्स्प्रेस सुसाट धावत आहे.

खटावच्या वस्ती भागात ही शाळा आहे. शाळा परिसरातील पालकांची घरातील भाषा कन्नड. त्यामुळे मुलांचेही संपूर्ण संभाषण कन्नड भाषेतून होते. या शाळेत बदलीने मीलन नागणे आणि अनिल मोहिते हे तरूण शिक्षक रूजू झाल्यानंतर त्यांनी कमी कालावधित शाळा नावारूपास आणली आहे. काहीशा गैरसोयीच्या असलेल्या या शाळेत नागणे आणि मोहिते यांनी प्रयत्न करत बदल घडविले आहेत. शाळेमध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी पालकांना प्रवृत्त केले. शिक्षक स्वत: पुढाकार घेऊन आपली शाळा चांगली करण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे पाहून पालकांनीही मदत सुरू केली आहे.

गुणवत्तेसोबतच परिसर सुशोभिकरण करत शालेय इमारत सुसज्ज असावी यासाठी इमारत रंगरंगोटी करण्याचे ठरविण्यात आले. जुन्या पत्र्याच्या खोल्यांना रेल्वेच्या प्रतिकृतीसारखी रंगछटा देण्याची संकल्पना पुढे आली. गावातील शाळेतील उत्साही शिक्षक सुनील लांडगे यांनी स्वत: सुटीच्या कालावधित शाळेमध्ये रेल्वेची प्रतिकृती साकारण्याची तयारी दर्शवली. दिवाळीच्या सुटीतही त्यांनी वेळ देत हे काम पूर्ण केले. अनिल मोहिते व मीलन नागणे हे दोघेही त्यांना मदतीसाठी होते.मंगळवारी खटावच्या सरपंच सुजाता व्हनानावर, उपसरपंच गुरुपाद पाटील, ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच रावसाहेब बेडगे, अमोल शिंदे आदींच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून शालेय प्रगतीच्या रुळावरून ‘व्हनानावर एक्स्प्रेस’ सुपरफास्ट वेगाने गतिमान करण्यात आली.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात माझी शाळा अभियान सुरू आहे. या अभियानातून लोकसहभागातून शाळांच्या प्रगतीची संकल्पना पुढे आली आहे. याच अभियानातून व्हनानावर वस्ती शाळेचे काम गतिमान सुरू आहे.या उपक्रमाची प्रेरणा घेत तालुक्यातील अन्य शाळांनीही आता उपक्रम राबविण्यासाठी नियोजन केले आहे. त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार आहेत.गुणवत्तेतही आघाडीवस्ती शाळेचे रूपडे बदलण्याबरोबरच येथील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठीही शिक्षकांनी प्रयत्न चालविले आहेत. त्यास चांगला प्रतिसाद मिळतो आहे.खटाव (ता. मिरज) येथील व्हनानावर वस्तीवरील शाळेला रेल्वेचे रुपडे मिळाल्यानंतर या उपक्रमाचे उद्घाटन सरपंच सुजाता व्हनानावर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी गुरुपाद पाटील, रावसाहेब बेडगे, अमोल शिंदे आदी उपस्थित होते. दुसºया छायाचित्रात नव्या इमारतीतून डोकावत विद्यार्थी व शिक्षकांनी या उपक्रमाचे उत्साहात स्वागत केले.

टॅग्स :Schoolशाळा