शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खरसुंडीत सिध्दनाथाची पौषी यात्रा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:04 IST

खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील श्री सिध्दनाथाची पौषी यात्रा सुरू झाली असून, ती खिलार जनावरांसाठी प्रसिध्द आहे. जातीवंत खिलार जनावरे आणि महाराष्टÑ, कर्नाटक , आंध्र प्रदेशातून खरेदी-विक्री करण्यासाठी व्यापारी दाखल झाले आहेत.पौष पौर्णिमेला दोन दिवस शेळ्या-मेंढ्यांची यात्रा भरत असते. त्यानंतर आठ ते दहा दिवस जनावरांची खरेदी-विक्री होत असते. यात्रेसाठी ...

खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील श्री सिध्दनाथाची पौषी यात्रा सुरू झाली असून, ती खिलार जनावरांसाठी प्रसिध्द आहे. जातीवंत खिलार जनावरे आणि महाराष्टÑ, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून खरेदी-विक्री करण्यासाठी व्यापारी दाखल झाले आहेत.पौष पौर्णिमेला दोन दिवस शेळ्या-मेंढ्यांची यात्रा भरत असते. त्यानंतर आठ ते दहा दिवस जनावरांची खरेदी-विक्री होत असते. यात्रेसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, देवस्थान, ग्रामपंचायत यांनी वीज, पाणी, जागा यांचे नियोजन केले आहे. जनावरांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. यात्रा तळावर वीज व इतर सुविधा दिल्या असून गुरूवार ते शनिवारपर्यंत यात्रेत गर्दी होणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड यांनी सांगितले.पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर आणि गावातील सार्वजनिक नळांना पुरेसे पाणी सोडले जात आहे. आरोग्य विभागाने यात्रेसाठी जादा औषधसाठा, डॉक्टर, कर्मचारी यांचे नियोजन केले आहे, असे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विनायक हात्तेकर यांनी सांगितले. यात्रेसाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला असून, यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस खाते दक्ष असून, नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी आवाहन केले आहे.एसटीच्या विविध आगारांतून यात्रा स्पेशल जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. यात्राकाळात एसटी स्थानकामध्ये यात्रेकरूंसाठी ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळाच्यावतीने झुणका-भाकर केंद्र चालू केले आहे. दहा रुपयांत ही सेवा दिली जाणार असल्याचे बाळासाहेब पाठक यांनी सांगितले. परिसरातील शेतकरी तसेच नजीकच्या सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातून जनावरांची मोठी आवक होत आहे. छोटी-मोठी हॉटेल्स, खानावळी, दुकाने गावात दाखल झाली आहेत. यामुळे गावातील बाजारपेठ फुलून गेली आहे. सिध्दनाथाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक खरसुंडीत दाखल होत आहेत.सोमवारी प्रदर्शन : विजेत्यास मानचिन्हसोमवार, दि. ८ रोजी जनावरांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून, विजेत्यास मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. शेतकºयांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामपंचायतीक डून करण्यात आले आहे.यात्रेकरूंना सुविधायात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, सरपंच सौ. लता पुजारी, उपसरपंच जितेंद्र पाटील, माजी उपसरपंच अर्जुन सावकार, विजय भांगे, ग्रामपंचायत, देवस्थान, कृषी उत्पन्न बाजार समिती संंयुुक्तपणे प्रयत्न करीत असून, यात्रेकरूंसाठी यात्रेच्या ठिकाणी जागा वाटप, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा दिली जात आहे.