शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दडी मारल्याने खरीप धोक्यात

By admin | Updated: July 12, 2017 00:05 IST

पावसाने दडी मारल्याने खरीप धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी तीन लाख ९१ हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी ६१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र सध्या पावसाने दडी मारल्यामुळे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, मिरज पूर्व तालुक्यातील कोवळ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. मागील वर्षापेक्षा यावर्षी ५० टक्केही पाऊस झाला नसल्यामुळे ७९ लघु प्रकल्पात तीन टक्के, तर पाच मध्यम प्रकल्पांत केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे खरीप हंगामातील पिके जगविणे हे आव्हान ठरणार आहे.जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र अत्यंत भिन्न आहे. शिराळा, वाळवा, पलूस, मिरज पश्चिम, तासगाव पश्चिम भाग आणि कडेगाव तालुक्यातील बहुतांशी खरीप पेरण्या मान्सून पावसावर होतात. पेरण्या झाल्यानंतर पाऊस गायब झाल्यास ८५ टक्के पिके वारणा आणि कृष्णा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या भागातील खरीप पेरण्या वाया जाण्याचा धोका कमी आहे. परंतु, यासाठी नदीमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीसाठा असण्याची गरज आहे. उर्वरित १५ टक्के पेरण्या केवळ पावसावरच अवलंबून आहेत. येथील पिके सध्या अडचणीत आहेत. जिल्ह्याचा सर्वाधिक मोठा भाग दुष्काळी पट्ट्यात येत आहे. यामध्ये खानापूर, आटपाडी, तासगाव, जत, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व आणि कडेगाव तालुक्यातील काही भागाचा समावेश होत आहे. या भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊस काहीप्रमाणात झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. पाऊस येईल म्हणून शेतकऱ्यांनी आतापर्यंत ६१ टक्के पेरण्या पूर्ण केल्या आहेत. बाजरी, ज्वारीची ८२.२ टक्के झाली आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात उडिदाची ९२ टक्के, तर मूग आणि तुरीची ३८ टक्के पेरणी झाली आहे. येथील पिके अर्धा ते एक फूट वाढून कोमेजली आहेत. माळरानावरील पिकांनी तर मानाच टाकल्या असून, दोन दिवसांत पाऊस आला नाही, तर येथे दुबार पेरणीच करावी लागणार आहे. पलूस, वाळवा, खानापूर, शिराळा, मिरज पश्चिम, तासगाव पश्चिम भागामध्ये सोयाबीनची पेरणी केली जाते. मान्सून पावसाचा जोर नसल्यामुळे केवळ २९.६ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचे आभाळाकडे लक्ष लागले आहे. जोराचा पाऊस झाल्याशिवाय येथील पेरण्या होणार नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे हवामान खात्याचे अंदाजही सध्या चुकत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. ..तरच पिके वाचू शकतील : राजेंद्र साबळेजिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत नक्कीच पाऊस कमी आहे. पण, येत्या चार दिवसांत पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पिके वाचण्यास मदत होईल. पाऊस झालाच नाही, तर खरीप हंगामातील दुष्काळी भागातील पिके वाया जाण्याची शक्यता आहे. चार दिवस वाट पाहून जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणीचा सद्य:स्थितीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी दिली.जिल्ह्यात आजअखेर झालेली पेरणीपीकपेरणी झालेले क्षेत्रभात१४७४० हेक्टरज्वारी२७०१० हेक्टरबाजरी३५०७४ हेक्टरमका१४६२४ हेक्टरतूर२८८७ हेक्टरमूग२९१९ हेक्टरउडीद७२३९ हेक्टरभुईमूग१२९५६ हेक्टरसोयाबीन२६३९७ हेक्टरजिल्ह्यातील पाऊस मि.मी.तालुका११ जुलै १७११ जुलै १६मिरज६३.८ २५७.२ जत१३९.२११९.२खानापूर७५.३१२४.५वाळवा१०३.६२५३.४तासगाव५२.५१६९.७शिराळा२४१.९५३०.२आटपाडी१४३.५१३६.२क़महांकाळ१२३.६२४२.१पलूस६५.२२०५.१कडेगाव६६.८१९३.२एकूण१०८.५२२०.३