शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कडेगाव तालुक्यात खरीप हंगाम वाया : ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 23:41 IST

यावर्षी पावसाने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेली पिके आणि सुगीचा आनंदही हिरावून घेतला आणि कर्जाचा बोजा मात्र जसाच्या तसाच ठेवला आहे. एवढे करूनही परतीचा पाऊस अजून माघारी जाण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देद्राक्षबागा, भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान

प्रताप महाडिक ।कडेगाव : यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला पेरण्यांची गणिते बिघडवून जूनमध्ये थोडासा उशिरा दाखल झालेला पाऊस तब्बल पाच महिने उलटले तरी कोसळतच आहे. कडेगाव तालुक्यात तर अतिवृष्टीने सारा खरीप हंगाम गिळून टाकला. शेतांमध्ये पाणी साठून ज्वारी, भात, सोयाबीन, भुईमूग आणि कडधान्ये कुजून गेली. यामुळे दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत सुगीचा काळ धो धो पावसातच गेला. आता धन-धान्याच्या राशी घरात आणण्याऐवजी, शेतात जाऊन सडलेली पिके पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

यावर्षी पावसाने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेली पिके आणि सुगीचा आनंदही हिरावून घेतला आणि कर्जाचा बोजा मात्र जसाच्या तसाच ठेवला आहे. एवढे करूनही परतीचा पाऊस अजून माघारी जाण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे. यावर्षी पावसाळ्यात जून ते सप्टेंबरअखेर ६६७ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. यानंतर आॅक्टोबरमध्येही सातत्याने आवकाळी पाऊस कोसळला आहे.

शेतक-यांची खरीप पिके वाया गेली असताना शासनाच्या कृषी विभागाने मात्र अद्याप नुकसानीचे पंचनामे केलेले नाहीत. राज्यातील सरकार अद्याप स्थापन झालेले नाही. तोपर्यंतच शेतकºयांपुढे पीक नुकसानीचा प्रश्न आ वासून उभा आहे.

मागीलवर्षी कोरड्या दुष्काळाने आणि यावर्षी ओल्या दुष्काळाने शेतकºयांच्या शेतातील हिरव्या सोन्याची लयलूट केली आणि शेती व्यवसायातील आनंदच हिरावून घेतला. हाता-तोंडाशी आलेली पिके डोळ्यांदेखत सडून जाताना पाहायची वेळ शेतकºयांवर आली. कडेगाव तालुक्यातील भात, ज्वारी, सोयाबीन आणि भुईमूग या पिकांसह कडधान्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अगदी द्राक्षबागा आणि भाजीपाला पिकांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

खरिपातील हातची पिके वाया गेल्याने आता रब्बीच्या पेरण्या कशा करायच्या, खते व बी-बियाणे यासाठी पैसे कुठून आणायचे, याची चिंता शेतक-यांसमोर आहे. अशा संकटात सापडलेल्या शेतकºयांचे अश्रू पुसण्याची गरज आहे. यासाठी नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.उसालाही फटकाअतिवृष्टीमुळे शेतात अद्यापही साचून राहिलेल्या पाण्याने ऊसही कुजतोय. जिथे निचरा होऊन पाणी निघून गेले, तिथेही उसाला फुटवा नाही आणि वाढही नाही. साहजिकच त्याचे दुष्परिणाम यंदाच्या आणि पुढील साखर हंगामावरही होतील. साखर कारखान्यांना गाळपासाठी पुरेसा ऊस मिळविण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. दरम्यान, साखर उत्पादन मर्यादित राहिल्यामुळे उसाला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना आहे. 

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी