फोटो ओळ :१) जत पूर्व भागात पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली आहे.
फोटो-०५संख२
२) संख (ता. जत) येथे पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांची उगवण झाली नाही. फोटो-०५संख१
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : जत तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांची ५८ हजार ३०१.२० हेक्टर क्षेत्रांवर पेरणी झाली आहे. रोहिणी नक्षत्रात १५ वर्षांनंतर पाऊस झाल्याने पेरणी वेळेवर झाली. मात्र, गेली २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. पाऊस सुरू न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे.
जत तालुक्यात खरीप हंगामातील बाजरी हे प्रमुख हंगाम आहे. बाजरीचे ३८ हजार हेक्टर क्षेत्रांवर पीक घेतले जाते. या हंगामात सूर्यफूल, मका, तूर, मटकी, मूग, भुईमूग, उडीद, सुर्यफूल ही पिके घेतली जातात. खरीप हंगाम पावसावर अंवलंबून असतो. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पावसाने दमदार हजेरी लावली होती. जून महिन्यात १७०.७ मि.मी. पाऊस झाला. माळरानात जमिनीत पेरणी केली जाते. १५ जूननंतर पावसाने दडी मारली आहे. जून महिन्यात १२ दिवसच पाऊस झाला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटणार आहे. उत्पादनात घट होणार आहे.
कोट
‘‘ मेंढ्या चारण्यासाठी चार महिने काळ्या रानात जातात. गबाळ संसाराचे साहित्य घेऊन जाण्यासाठी दोन घोडे घेऊन जातात. मुलाप्रमाणे जिवापाड संगोपन केलेल्या घोडा जोडीने पेरणी केली आहे. पाऊस न झाल्याने पिके सुकू लागली आहेत."
शंकर तुराई शेतकरी, राजोबाचीवाडी.
चाैकट
जून महिन्यातील पावसाची मंडलनिहाय आकडेवारी (मि.मी. मध्ये)
संख १४८.५
डफळापूर २३५.२
कुंभारी १७२.५
जत १६०.७
शेगाव १४८.७
माडग्याळ १२८.१
उमदी २१५.९
मुचंडी १५७.१
एकूण १७०.८