शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खरीप आला दाराला, कर्ज मिळेना पिकाला

By admin | Updated: June 3, 2015 01:01 IST

जिल्हा बँकेची वाटपात आघाडी : जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत पंधरा बॅँकांनी घातला पीक कर्जाला खोडा

अशोक डोंबाळे - सांगली --खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला असून, जिल्हा प्रशासनाने यावर्षी ८८१ कोटी ४६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे नियोजन केले आहे. मात्र, अद्याप जिल्ह्यातील पंधरा राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज वाटपाचा श्रीगणेशाही केला नसल्याने शेतकऱ्यांना खरीप पीक पेरणीसाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. उर्वरित वीस बँकांनी आतापर्यंत ४३ हजार ४४९ खातेदारांना २१९ कोटी ९८ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. यामध्ये जिल्हा बँकेने ४२० कोटी ७५ लाख पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टापैकी सर्वाधिक १५८ कोटी १९ लाखांचे कर्ज वाटप करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.२५ मे पासून रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली आहे. ८ जूनला मृग नक्षत्र लागणार आहे. सर्वसाधारणपणे मृग नक्षत्रापासूनच जिल्ह्यात पाऊस पडायला सुरुवात होत असते. उन्हाळी पाऊस जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये झाला आहे. त्यामुळे मृग नक्षत्रात पेरणीच्या कामांना वेग येतो. आता शेतकरी मान्सूनपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहे. पेरणीसाठी खते आणि बी-बियाणांची जुळवाजुळव करीत आहे. मात्र, गेल्या दोन वर्षातील अवकाळी पाऊस आणि साखरेचे दर उतरल्यामुळे कारखान्यांकडून शेतकऱ्यांना उसाची बिले वेळेवर मिळत नसल्यामुळे ते संकटात सापडले आहेत. शेतकऱ्याला बी-बियाणे खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणी येत आहे. तो बँक, सावकार, नातेवाईक यांच्याकडे कर्जासाठी धावपळ करीत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सहकारी आणि राष्ट्रीयीकृत ३५ बँका असून, या बँकांनी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना ८८१ कोटी ४६ लाखांचे कर्ज वाटप केले पाहिजे, असा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार वीस बँकांनी आतापर्यंत ४३ हजार ४४९ खातेदारांना २१९ कोटी ९८ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. पंधरा राष्ट्रीयीकृत बँकांनी मात्र खरीप हंगामास सुरुवात झाली तरीही कर्ज वाटपाचा श्रीगणेशाही केला नाही. शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळाल्यास बी-बियाणे व खते खरेदी करण्यासाठी जास्त अडचणींचा सामना करावा लागणार नाही. मात्र बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांना नाममात्र कर्ज देऊन कर्ज वाटपाचा श्रीगणेशा केल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. प्रत्यक्षात मात्र स्थिती वेगळीच असून, अनेकांनी कर्जासाठी अर्ज करूनही त्यांच्या प्रकरणांवर कार्यवाही झालेली नाही. कृषी विभागाने खरीप पीक पेरणी अहवाल तयार करून विविध बँकांमार्फत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले असले तरी, अनेक शेतकऱ्यांना कर्जासाठी हेलपाटे मारावे लागत असल्याचे दिसत आहे. सात-बारावरील हिस्सेदारांची सहमती, यापूर्वीच्या कर्जाचा बोजा, कर्ज नसल्याचा दाखला अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर येत आहेत. त्यामुळे कर्ज मिळण्यास आणखी किती दिवसांचा कालावधी लागेल, याची चौकशी करण्यासाठी शेतकरी बँकेचे उंबरे झिजवत आहेत. याकडे जिल्ह्यातील राज्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या संघटनांनीही आवाज उठविण्याची गरज आहे. त्यामुळे काही शेतकरी, बँकेच्या कर्जापेक्षा नातेवाईक किंवा सावकार यांच्याकडून मिळणारे कर्ज लवकर मिळत असल्याने त्यांच्याकडे वळले असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.बँकउद्दिष्टसाध्यखातेदार आंध्रा१७००बँक आॅफ बडोदा२६.५५ ३.४६१३६बँक आॅफ इंडिया५८.८०१८.३७१९२३बँक आॅफ महाराष्ट्र५४.५०२.१४२६८कॅनरा बँक७.७०१.०९६७सेन्ट्रल बँक आॅफ इंडिया७.८६०.२३२१कॉर्पोरेशन बँक७.८०००देना बँक६१६१.६८५२आयडीबीआय बँक६८००.४६१२इंडियन बँक५५१.०४३इंडियन ओव्हरसीज बँक२.३५०.०३१ओरिएंटल बँक०.०३००पंजाब अ‍ॅण्ड सिंध०.३५००पंजाब नॅशनल०.३२००स्टेट बँक हैदराबाद०.१६००बँकउद्दिष्टसाध्यखातेदार स्टेट बँक आॅफ इंडिया५२.२५१०.३२३७६सिंडिकेट बँक१.३७००युको२.४७००युनियन बँक आॅफ इंडिया३८.२८१.७७१३८युनायटेड बँक आॅफ इंडिया०.६०००विजया बँक४.१२०.३६३९अ‍ॅक्सेस बँक७.७०००फेडरल६.३२००एचडीएफसी१७.९०२.१२३८आयसीआयसीआय९९.००११.५९१५७८कर्नाटका बँक१.४५०.०७६रत्नाकर बँक४५.८०२१.३७५५५विदर्भ, कोकण ग्रामीण३.३५०.२०२०राज्य व जिल्हा बँक४२०.७५१५८.१९३८२१६एकूण८८१.४६२१९.९८४३४४९शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कर्ज वाटप करणारपंधरा राष्ट्रीय बँकांनी आतापर्यंत एक रूपयाही कर्ज वाटप केलेले नाही. याप्रकरणी बँकांशी संपर्क साधला असता, अग्रणी बँकेने ठरवून दिलेल्या खरीप पीक कर्जाच्या उद्दिष्टानुसार येत्या महिन्यात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आम्ही कर्ज वाटप करणार असल्याचे तेथील प्रशासनाने सांगितले आहे. प्रत्यक्षात किती बँका पीककर्ज वाटप करतात, ते येत्या दोन महिन्यात स्पष्ट होणार आहे.