नूतन अध्यक्ष ॲड. युवराज गोडसे व कार्यकारणीचा शपथविधी डॉ. किरण नरदे यांनी घेतला. प्रा. एच. एस. पाटील अध्यक्षस्थानी होते. सुलतानगादेचे माजी सरपंच एस. आर. पाटील, विभागीय अध्यक्ष विलास बिराजदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. पाटील म्हणाले, खानापूर लायन्स क्लबचे सामाजिक काम कौतुकास्पद आहे. आतापर्यंत केलेले उपक्रम प्रेरणादायी आहेत. यापुढेही समाजाच्या हिताची कामे करावीत. नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :- उपाध्यक्ष : कन्हैया स्वामी, सचिव : शाहरुख पठाण, खजिनदार : डॉ. किरण नरदे, ट्वेल टिस्टर : अलीअकबर पिरजादे, टेमर : ॲड. विराज माने, सदस्य, प्रा. एम. ए. इनामदार, रामचंद्र डोंगरे, प्रकाश जोशी, डॉ. उदय हजारे, तानाजी ठोंबरे, गजानन टिंगरे, डॉ. आलोक नरदे, रवींद्र टिंगरे, अनिलदत्त डोंगरे, भगवान जाधव.
खानापूर लायन्स क्लबचा शपथविधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:32 IST