शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

कवठेमहांकाळ तालुक्यात आबा-सगरे गटाची बाजी

By admin | Updated: February 23, 2015 00:17 IST

काका-सरकार गटाला धक्का : देशिंग, हिंगणगाव, तिसंगी, कुंडलापूर सोसायट्यांवर वर्चस्व

कवठेमहांकाळ : देशिंग, हिंगणगाव, तिसंगी, कुंडलापूर या चार गावच्या झालेल्या विकास सोसायटींच्या निवडणुकीत आबा-सगरे गटाने एकतर्फी विजय मिळवित आबांना आदरांजली वाहिली, तर विरोधी काका-सरकार पॅनेलचा धुव्वा उडाला आहे. तिसंगी, हिंगणगाव, कुंडलापूर, देशिंग या चार गावांच्या विकास सोसायटींच्या निवडणुका ऐन आबांच्या दु:खात पार पडल्या. घाटमाथ्यावरील कुंडलापूर सोसायटीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. येथे आर. आर. आबा पाटील विकास पॅनेल विरुद्ध काका-सरकार पॅनेल असा थेट सामना झाला. आर. आर. (आबा) पाटील विकास पॅनेलच्या मदतीला विजयराव सगरे यांची मोठी ताकद मिळाली. आबा-सगरे गटाच्या कार्यकत्यानी विरोधी पॅनेलचा सुपडासाफ केला. १३ च्या १३ जागांवर मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळविला. आबा-सगरे गटाच्या पॅनेलच्या उमेदवारांना प्रत्येकी २१० पैकी १२६ मते मिळाली, तर विरोधी काका-सरकार पॅनेलच्या उमेदवारांना प्रत्येकी अवघ्या ५३ मतांवर समाधान मानावे लागले.आबा-सगरे गटाच्या पॅनेलचे नेतृत्व युवा नेते दीपक चव्हाण यांनी केले, तर त्यांना विजय चव्हाण, प्रल्हाद हाक्के, डॉ. माणिक पाटील यांचे मोलाचे सहकार्य मिळाले, तर विरोधी पॅनेलचे नेतृत्व सरपंच पोपट गिड्डे, दिलीप पाटील, बबन माने यांनी केले.तिसंगी विकास सोसायटीवरही आबा-सगरे गटाने राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला. १३ पैकी १० जागा आबा-सगरे गटाने पटकावल्या, तर विरोधी काका-सरकार गटाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. विजयी सिद्धनाथ विकास पॅनेलचे नेतृत्व विठ्ठल कदम, तानाजी कदम, धनाजी पाटील, जगदीश पोळ, रघुनाथ जाधव यांनी केले, तर विरुद्ध पराभूत काका-सरकार पॅनेलची धुरा सुशांत पोळ, रमेश पोळ, बाळासाहेब पोळ, सुरेश पोळ यांनी वाहिली.हिंगणगाव येथील विकास सोसायटीच्या निवडणुकीत आबा-सगरे गटाच्या महांकाली शेतकरी पॅनेल विरुद्ध काका-सरकार गटाचे परिवर्तन पॅनेल असा सामना झाला. यामध्ये १३ पैकी तब्बल ९ जागा आबा-सगरे गटाने जिंकल्या, तर अवघ्या चार जागा काका-सरकार गटाला मिळाल्या. आबा-सगरे गटाच्या पॅनेलचे नेतृत्व चंद्रकांत लोंढे, राजाराम सगरे, रावसाहेब पाटील, आदगोंडा पाटील यांनी केले, तर विरोधी पॅनेलचे नेतृत्व दीपक लोंढे, शकुंतला पाटील, चंद्रकांत पाटील यांनी केले. संपूर्ण तालुक्याचे लक्ष देशिंग येथील विकास सोसायटीच्या निवडणुकीकडे लागले होते. कारण येथे अजितराव घोरपडे यांचे कट्टर विरोधक, बाजार समितीचे माजी उपसभापती भारत डुबुले यांचा पाडाव करण्यासाठी घोरपडे यांनी कंबर कसली होती; परंतु यामध्ये भारत डुबुले वरचढ ठरले.येथील निवडणुकीत १३ पैकी तब्बल १२ जागा आबा-सगरे गटाच्या महालक्ष्मी शेतकरी पॅनेलने जिंकल्या, तर काका-सरकार गटाच्या अंबिका महांकाली पॅनेलला केवळ १ जागा मिळाली. विशेष म्हणजे जिल्हा बॅँकेचे माजी संचालक जयराजबाबा घोरपडे यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. विजयी आबा-सगरे गटाच्या पॅनेलचे नेतृत्व भारत डुबुले, विलासराव कोळेकर, आप्पासाहेब कोळेकर, विष्णू जगताप यांनी केले, तर विरोधी पॅनेलचे नेतृत्व जयराज घोरपडे, संभाजी पवार यांनी केले. (वार्ताहर)विजय आबांना अर्पणया चारही विकास सोसायटी आबा-सगरे गटाने जिंकल्या, परंतु दु:खात असणाऱ्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला नाही, फटाके उडविले नाहीत. उलट स्तब्ध राहून आबांना विजय समर्पित करीत श्रद्धांजली वाहिली व कार्यकर्ते घरी निघून गेले... तरीही पराभवदेशिंगच्या विकास सोसायटीच्या निवडणुकीदिवशी अजितराव घोरपडे यांनी मतदान केंद्रावर चार तास तळ ठोकूनही त्यांच्या गटाला मोठा पराभव स्वीकारावा लागला.