तालुक्यातील सलून व्यवसाय बंद करू नये, यासाठी सोमवारी येथील नाभिक समाजाच्या वतीने तहसीलदार बी. जे. गोरे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ५ एप्रिलपासून सलून व्यवसाय व ब्युटीपार्लर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, हा निर्णय सलून व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना अडचणीचा आहे. व्यवसाय बंद राहिल्याने दुकानाचे भाडे, वीजबिल, कर्जाचे हप्ते कुठून भरायचे? कुटुंब कसे चालवायचे? सलून दुकाने चालू ठेवावीत, याठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर प्रवीण सपकाळ, भगवान सपकाळ, विजय वासकर, राम खंडागळे, रवी सपकाळ यांच्यासह नाभिक बांधवांच्या सह्या आहेत.