शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

'उडाण'च्या यादीत सांगलीजवळील कवलापूर विमानतळचा उल्लेख

By शीतल पाटील | Updated: April 6, 2023 19:46 IST

माहिती अधिकारातून खुलासा : विमानतळ उभारणीच्या मागणीला बळ

सांगली : केंद्र शासनाच्या उडाण योजनेच्या यादीत ‘बंद अवस्थेत’, असा कवलापूर विमानतळाचा उल्लेख आहे. राज्य शासनाने विमानतळाच्या विषय निकाली काढला होता, मात्र एखाद्या कंपनीने प्रस्ताव दिला तर या विमानतळाच्या पुनरुज्जीवनाचा विचार होऊ शकतो, अशी माहिती नवी दिल्लीतील एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर विक्रम सिंग यांनी दिली आहे. आयआयटीमध्ये कार्यरत स्वानंद बोडस यांनी माहिती अधिकारात दाखल अर्जातून हा खुलासा झाला आहे. त्यामुळे कवलापूर विमानतळ उभारणीला बळ आले आहे.

कवलापूर येथील विमानतळासाठी बचाव कृती समितीने आंदोलन छेडले आहे. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी विमानतळाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्याबाबत बैठक बोलावली आहे. त्याआधी विमानतळ प्राधीकरणाने माहिती अधिकार कायद्यातील अर्जास उत्तर देताना कवलापूर विमानतळाबाबत महत्वाची माहिती उघड केली.

नागरी उड्डाण मंत्रालयाने ऑक्टोबर २०१६ मध्ये उडान योजना सुरु केली. त्याच्या यादीत कवलापूर विमानतळाचा उल्लेख आहे. धावपटी नादुरुस्त असल्यामुळे बंद असलेले विमानतळ म्हणून कवलापूरचा उल्लेख आहे. उडान योजना अंतर्गत विमानतळ विकासासाठी चार फेऱ्या झाल्या. कवलापूर विमानतळ चालवण्याबाबत कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे विमानतळ पुनरुज्जीवन होऊ शकले नाही. भविष्यात प्रस्ताव आल्यास पुनरुज्जीवन शक्य आहे, असे उत्तर माहिती अधिकारात देण्यात आले आहे. याबाबत कृती समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार आणि सतीश साखळकर म्हणाले, ‘‘कवलापूर विमानतळाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव ताकदीने पुढे आणला. त्याला तांत्रिक बळकटी मिळत आहे. उडाण योजनेतून ते विकसीत व्हावे, ही मागणी योग्यच आहे. आता राज्य व केंद्र शासनाकडे आग्रही मागणी करू. कृषी औद्योगिक विकास आणि आंतरराष्ट्रीय कृषी व्यापार हे सांगलीचे भविष्य आहे आणि त्यात कवलापूर विमानतळ केंद्रस्थानी असेल.तांत्रिक आधार मिळालाकवलापूर येथे नवीन विमानतळाची मागणी नसून जुने विमानतळ पुनरुज्जीवीत करावे, हा मुद्दा तांत्रिकदृष्ट्या महत्वाचा आहे. विमानतळ बचाव कृती समितीने त्याबाबत सांगलीकरांचे प्रत्यक्ष विमान पाहिल्याचे अनुभव पुराव्याच्या स्वरुपात जमवले आहेत. त्याला तांत्रिक आधार मिळाला आहे.

टॅग्स :SangliसांगलीAirportविमानतळ