शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

कासेगाव प्रा. आरोग्य केंद्राच्या विश्रामगृहात बांधकाम साहित्य

By admin | Updated: December 1, 2014 00:12 IST

नाहक त्रास : वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवासाची अडचण

कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय घोलप हे गेल्या चार महिन्यांपासून परिचारिका विश्रामगृहात राहत आहेत. त्यांच्यासाठी राखीव असणाऱ्या शासकीय विश्रामगृहात खासगी ठेकेदाराने सिमेंट, सळी आदी बांधकामाचे साहित्य भरुन ठेवले आहे. डॉ. घोलप यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.कासेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. पूर्वीचे डॉ. विश्वंभर काटकर यांनी तर आपल्या ‘लेट लतीफ’ कारनाम्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राला चांगलेच चर्चेत आणले होते. त्यांच्या बदलीनंतर याठिकाणी कार्यरत असणारे सांगलीचे डॉ. अक्षय घोलप यांना येथील खासगी ठेकेदाराच्या चुकीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वीचे डॉक्टर या ठिकाणी राहात नसल्याची तक्रार होती, तर आता कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना या ठिकाणी राहण्यासाठी योग्य शासकीय निवासस्थान नसल्याने प्रचंड गैरसोयींना तोंड द्यावे लागते. त्यांना मिळालेल्या या खोलीमध्ये पाण्याची व्यवस्था योग्य नाही. तसेच शौचालय व स्वच्छतागृहाचीअवस्था अत्यंत दयनीय असून त्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. भिंतीला तडे गेले असून ठिकठिकाणी छिद्रे पडलेली आहेत. गेल्या चार महिन्यांपासून ही अवस्था असून त्याची दखल वरिष्ठांनी घ्यावी, अशी मागणी होत आहे. घोलप यांनी आपल्या अल्प कारकीर्दीत येथील लोकांचा विश्वास संपादन केला असून ते जातीने रुग्णालयात हजर असतात. सध्या घोलप यांना मिळणाऱ्या वागणुकीमुळे सर्वसामान्य लोकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)कासेगाव प्रा. आरोग्य केंद्राच्या विश्रामगृहात बांधकाम साहित्यनाहक त्रास : वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवासाची अडचणकासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय घोलप हे गेल्या चार महिन्यांपासून परिचारिका विश्रामगृहात राहत आहेत. त्यांच्यासाठी राखीव असणाऱ्या शासकीय विश्रामगृहात खासगी ठेकेदाराने सिमेंट, सळी आदी बांधकामाचे साहित्य भरुन ठेवले आहे. डॉ. घोलप यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.कासेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असते. पूर्वीचे डॉ. विश्वंभर काटकर यांनी तर आपल्या ‘लेट लतीफ’ कारनाम्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राला चांगलेच चर्चेत आणले होते. त्यांच्या बदलीनंतर याठिकाणी कार्यरत असणारे सांगलीचे डॉ. अक्षय घोलप यांना येथील खासगी ठेकेदाराच्या चुकीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वीचे डॉक्टर या ठिकाणी राहात नसल्याची तक्रार होती, तर आता कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना या ठिकाणी राहण्यासाठी योग्य शासकीय निवासस्थान नसल्याने प्रचंड गैरसोयींना तोंड द्यावे लागते. त्यांना मिळालेल्या या खोलीमध्ये पाण्याची व्यवस्था योग्य नाही. तसेच शौचालय व स्वच्छतागृहाचीअवस्था अत्यंत दयनीय असून त्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. भिंतीला तडे गेले असून ठिकठिकाणी छिद्रे पडलेली आहेत. गेल्या चार महिन्यांपासून ही अवस्था असून त्याची दखल वरिष्ठांनी घ्यावी, अशी मागणी होत आहे. घोलप यांनी आपल्या अल्प कारकीर्दीत येथील लोकांचा विश्वास संपादन केला असून ते जातीने रुग्णालयात हजर असतात. सध्या घोलप यांना मिळणाऱ्या वागणुकीमुळे सर्वसामान्य लोकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे पूर्वीचे डॉ. विश्वंभर काटकर हे आपल्या ‘लेट लतीफ’ कारनाम्यामुळे तालुक्यात चांगलेच चर्चेत आले होते. त्यांच्या बदलीनंतर सांगलीचे डॉ. अक्षय घोलप यांनी आरोग्य केंद्राचा पदभार हाती घेतला. पण येथील ठेकेदाराच्या चुकीमुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वीचे डॉक्टर केंद्रात राहत नसल्याची तक्रार होती, आताच्या डॉक्टरांना निवासस्थानच नाही, अशी स्थिती आहे.