शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पतंगराव कदम यांच्याकडून कर्नाटकच्या पाण्याचे आमिष

By admin | Updated: February 19, 2017 00:25 IST

विलासराव जगताप : वाळेखिंडी, शेगाव येथे प्रचारसभा

जत : आमदार डॉ. पतंगराव कदम व सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे संचालक विक्रम सावंत हे तालुक्याच्या पूर्व भागातील जनतेला कर्नाटकातील तुबची, बबलेश्वर आणि हिरेपडसलगी योजनेतून पाणी देतो, असे सांगून गाजराची पुंगी वाजवत आहेत, अशी टीका आमदार विलासराव जगताप यांनी केली.जि. प. व पं. स. निवडणूक प्रचारार्थ वाळेखिंडी, बनाळी, आवंढी, शेगाव आणि सिंगनहळ्ळी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, तालुक्यासाठी म्हैसाळ योजना पूर्णत्वास येत आहे. पश्चिम भागात पाणी आले आहे. या योजनेच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. राज्यातील योजनेचा पाठपुरावा करणे सोयीचे होते. परराज्यातील योजनेचा पाठपुरावा करणे गैरसोयीचे होते. असे असतानाही कॉँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते तुबची, बबलेश्वर व हिरेपडसलगी योजनेचे गाजर जत तालुक्यातील जनतेला दाखवून त्यांची दिशाभूल करत आहेत. जत येथील राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना बंद पाडून तो विक्री करण्यास हेच नेते आणि कार्यकर्ते कारणीभूत आहेत. पतंगराव कदम व सावंत यांनी तालुक्यात दोन साखर कारखाने काढतो म्हणून अत्यल्प किंमतीत शेतकऱ्यांची जमीन खरेदी करून ठेवली आहे. परंतु मागील चार-पाच वर्षात तेथे काहीच काम सुरू करण्यात आले नाही, असा आरोप त्यांनी केला. सांगली जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संजयकुमार सावंत म्हणाले की, जगताप यांनी तालुक्यात जातीपातीचे राजकारण केले नाही. जनता व सर्वसामान्य कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून त्यांनी आजपर्यंत राजकारण केले आहे. कोणत्याही पदापेक्षा सर्वसामान्यांशी त्यांनी आपली नाळ कायम ठेवली आहे. सभेस भाजप सांगली जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, जत तालुका अध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी, माजी अध्यक्ष शिवाजीराव ताड, माणिक पाटील व जि. प. आणि पं. स. उमेदवार उपस्थित होते. (वार्ताहर)