आष्टा : मिरजवाडी (ता. वाळवा) येथील उपसरपंचपदी कल्पना काशिनाथ खोत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच विपीन खोत यांनी काम पाहिले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे सदस्य संभाजी कचरे, पंचायत समितीचे सदस्य जनार्दन पाटील, राजारामबापू बँकेचे संचालक अनिल गायकवाड प्रमुख उपस्थित होते. स्वाती साळुंखे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने कल्पना खोत यांची निवड करण्यात आली. अनिल गायकवाड यांनी स्वागत केले, तर ग्रामसेविका ए. व्ही. जाधव यांनी आभार मानले. यावेळी वसंत सावंत, विलास पाटील, काशिनाथ खोत, पंडित नागरे, तानाजी खोत, निवास घाईल, हरी खिलारे, सुरेंद्र साळुंखे, प्रकाश नरुटे उपस्थित होते
फोटो : मिरजवाडीच्या उपसरपंचपदी कल्पना खोत यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संभाजी कचरे, जनार्दन पाटील, अनिल गायकवाड, विपिन खोत, काशिनाथ खोत.